आमदार डॉक्टर देवराव होळी यांच्या वाढदिवसानिमित्त १० डिसेंबर ला विविध कार्यक्रमांचे आयोजन…

0
100

दिनांक १० डिसेंबर २०२३ गडचिरोली.

 

गडचिरोली जिल्हा उद्योग क्रांतीचे जनक विधानसभा क्षेत्राचे लोकप्रिय आमदार डॉक्टर देवराव होळी यांचा १० डिसेंबर वाढदिवस असून वाढदिवसानिमित्त गडचिरोली विधानसभा क्षेत्रामध्ये  विविध कार्यक्रमांचे भव्य दिव्य आयोजन करण्यात आले आहे. सकाळी ७ वाजता गडचिरोली येथे फिरत्या मनोरुग्णांना ब्लॅंकेटचे वाटप,  सकाळी ९ वाजता गडचिरोली, चामोर्शी व धानोरा येथील रुग्णालयांमध्ये रुग्णांना फळवाटप, सकाळी १० वा चामोर्शी राहते घरी भजन कीर्तन व पारिवारिक पद्धतीने वाढदिवस , चामोर्शी येथील ग्रामीण रुग्णालयामध्ये सकाळी ११ वाजता आरोग्य शिबिर व रक्तदान शिबिराचे आयोजन ,  दुपारी १२ वा. श्री साई इन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंग अँड मेडिकल सायन्सेस वाकडी गडचिरोली येथे आभा कार्ड वाटप व केक कापणे, दुपारी १२ :३०  वाजता फूड अँड ड्रग या नूतन इमारत बांधकामाचे व , समाज कल्याण वसतिगृह बांधकामाचे भूमिपूजन , दुपारी १ : ३० वा. राष्ट्रीय मानवाधिकार संघटनेच्या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत.

आज दुपारी २:३० वाजता गानली सभागृह गडचिरोली येथे आमदार डॉक्टर देवराव होळी व भाजपा मित्र परिवाराच्या वतीने  वाढदिवस कार्यक्रमाचे आयोजन, सायंकाळी ५ वाजता चामोर्शी येथील जनसंपर्क कार्यालयामध्ये राखीव , सायंकाळी ६:३० वाजता हरडे कृषी महाविद्यालय लाल डोंगरी चामोर्शी येथे वाढदिवसाचा कार्यक्रम , रात्रौ ८ वाजता आमदार डॉक्टर देवराव होळी मित्र परिवाराच्या वतीने  गौतमी पाटील यांच्या सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here