भाजप सरकार चे पितळ उघडं करण्यासाठी शिवसेना मैदानात…
अहेरी तालुक्यातील अतिदुर्गम नक्षलग्रस्त भागातील जीमलगट्टा येथे गडचिरोली जिल्हा संपर्कप्रमुख महेश केदारी आणि अहेरी विधानसभा जिल्हाप्रमुख रियाज शेख यांच्या उपस्थितीत होऊ द्या चर्चा उपक्रमात शासनाच्या भांडाफोड कार्यक्रम घेण्यात आला यावेळी स्थानिक गावकऱ्यांच्या वतीने आदिवासी पारंपारिक पद्धतीने ढोल ताशांनी नृत्य सादर करीत महेश केदारी गडचिरोली जिल्हा संपर्क प्रमुख यांचे जोरदार स्वागत करण्यात आले या कार्यक्रमाचे अध्यक्ष महेश केदारी यांनी आपल्या भाषणात सांगितले विधानसभा क्षेत्रात शून्य प्रमाणात विकास झालेला आहे केंद्र सरकार व राज्य सरकार केवळ कागदावर गडचिरोली जिल्ह्याच्या विकास झाल्याचे प्रसिद्धी च्या माध्यमाने प्रचार व प्रसार करीत आहे गडचिरोली जिल्ह्यात अनेक प्रश्न असतानाही खासदार आमदार यांनी ज्याप्रमाणे जनतेची मूलभूत प्रश्न सोडविण्यात अपयशी ठरले लोकप्रतिनिधींच्या निष्क्रिय कार्यामुळे जनतेच्या हाल बेहाल झालेला आहे खेड्यापाड्यात कोणत्याही योजनाच्या लाभ मिळत नाही लाभार्थ्यांना शासन योजनेचे नावे सुद्धा माहित नाही असे खोटारड्या योजनांच्या विरोधात महेश केदारी यांनी जोरदार प्रहार करून स्थानिक मुद्द्यावर म्हणाले की जिमलगट्टा तालुक्याची मागणी अनेक वर्षापासून होत असताना सुद्धा आज पर्यंत जिमलगट्टा ला तालुक्याच्या दर्जा देण्यात आला नाही, रस्ते नाही, पिण्याचे पाण्याची सोय नाही, दर्जेदार शिक्षण नाही, विद्युत पुरवठा वारंवार बंद होत असतो, रुग्णालयाची सोय नाही रुग्णालय असेल तर तिथं डॉक्टर नाही, मुख्यालयावर कर्मचारी अधिकारी वर्ग उपस्थित राहत नाही असे अनेक प्रश्नावर संताप व्यक्त करीत महेश केदारी यांनी शासनाच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करीत हल्लाबोल केले.
यावेळी या कार्यक्रमात जिल्हाप्रमुख रियाज शेख यांनी सांगितले की जोपर्यंत जनता जन आंदोलन उभारत नाही तोपर्यंत शासन झोपेतून उठणार नाही म्हणून पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेनेला आदेश दिलेले आहे महाराष्ट्र राज्यात होऊ द्या चर्चेच्या माध्यमातून प्रत्येक खेड्यापाड्यात जाऊन जनतेची संवाद साधून कागदावर राबवीत असलेल्या बोल बच्चन योजनेच्या विरोधात पोल खोल कार्यक्रम घेण्यात येत आहे. या कार्यक्रमात जनतेकडून चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे चित्र दिसून आले होते. अक्षय पुंगाटी यांनी प्रास्ताविक मार्गदर्शन केले. होऊ द्या चर्चा या कार्यक्रमात प्रफुल एरणे अहेरी तालुकाप्रमुख मनीष दुर्गे येतापल्ली तालुकाप्रमुख अक्षय पुंगाटी युवा सेना तालुकाप्रमुख सौ तुळजा ताई तलांडे युती सेना जिल्हा पदाधिकारी, सपना ताई ईश्वरकर तालुका संघटिका, आयान पठाण शहर प्रमुख ,अक्षय कुडमेते उपशहर प्रमुख ,आलापल्ली जहीर शेख जिमलगट्टा सर्कल प्रमुख, अनिल आत्राम विभाग प्रमुख, वसंत कन्नाके उपविभाग प्रमुख संतोष आत्राम उपविभाग प्रमुख बबलू शेख शाखाप्रमुख नागेश उपला उपशाखाप्रमुख लक्ष्मी सोया विभाग प्रमुख श्रीमती मिसाळ विभाग प्रमुख प्रियंका वेलादी उप विभाग प्रमुख आकाश गणपत नेता दीपक तोरण संदीप आत्राम योगेश मडावी आकाश मडावी रोहित आत्राम शिवसैनिक पदाधिकारी या कार्यक्रमात प्रामुख्याने उपस्थित होते