तुलसी बाई जैन (बैद) यांचे दुःखद निधन…खासदार अशोक नेते यांनी घेतली जैन कुटुंबीयांची सांत्वना भेट.

0
178

 

 

गडचिरोली:दि.१४ सप्टेंबर

 

गडचिरोली: गडचिरोली येथील प्रतिष्ठीत उद्योजक विकास व मनोज जैन यांच्या मातोश्री तसेच डॉ.गणेश जैन यांच्या बहीण तुलशीबाई जैन (बैद)वय ८५ वर्ष, यांचे  वृद्धपकाळाने निधन झाले.

या विषयी दुःखद वार्ता मिळताच लगेच खासदार अशोक नेते यांनी त्यांच्या रेड्डी गोडाऊन जवळ गडचिरोली येथील निवासस्थानी भेट घेत,त्यांच्या दुःखात सामील होऊन जैन यांच्या कुटुंबीयांचे सांत्वन केले.

कठाणी नदीच्या तीरावर स्व.तुलसी बाई जैन यांच्या वर अंतिम संस्कार करण्यात आले असून या वेळी झालेल्या शोकसभेत,माजी मंत्री वसंत पुरके,भाजप चे जिल्हाध्यक्ष प्रशांत वाघरे, प्रमोद पीपरे ,काँग्रेस चे अध्यक्ष महेंद्र ब्राम्हणवाडे,विश्वजित कोवासे यांच्या सह शेकडो गणमान्य नागरिक उपस्थित होते.

स्व.तुलसी बाई जैन यांच्या कुटुंबात पती, तीन मुले,एक मुलगी,नातवंडं असा बराच मोठा आप्त परिवार आहे.

यावेळी स्व.तुलसी बाई जैन यांना भावपुर्ण श्रध्दांजली वाहण्यात आली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here