अज्ञात वाहनाच्या धडकेत पोलिस शिपाई जागीच ठार… बिघडलेल्या वाहतुकीचा बळी ठरला पोलिस कर्मचारी.

0
998

दिनांक.16 सप्टेंबर.

आष्टी: पोलिस मुख्यालय. गडचिरोली येथे कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्याचे एका अज्ञात वाहनाच्या धडकेत दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना आज सकाळी आष्टी पोलिस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या अड्याळ या गावात घडली.

या अपघातात मृत्यू झालेल्या पोलिस कर्मचाऱ्याचे नाव प्रणय ताराचंद वाळके वय ३० वर्ष असून हा मुधोली गावचा रहिवासी होता.

या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी पोहचले होते,पंचनामा करून मृतदेह शव विच्छेदनासाठी चामोर्षी रुग्णालयात पाठविण्यात आले होते.

आष्टी आलापल्ली या महामार्गावर संथ गतीने सुरू असलेले रोडचे काम आणि सध्या लोकांना सर्वात जास्त त्रासदायक असणारी या बिघडलेल्या वाहतूकी मुळे मागील दोन वर्षात जवळ पास ६५ लोकांचा मृत्यू झाला असून आता या बिघडलेल्या वाहतूकीचा आज पोलिस कर्मचारी च बळी ठरल्याची विदारक परिस्थिती पाहायला मिळाली आहे.

घटनेची सविस्तर माहिती जाणून घेतली असता, प्रणय वाळके हा कर्तव्यावर असताना हा अपघात झाला होता. सदर अज्ञात वाहन धडक देऊन घटनास्थळावरून पसार झाला होता,त्या वाहनाचा शोध घेण्याचा प्रयत्न केला जात असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here