करोडोचा गंडा घालणारा भिसी खेळवणारा आरोपी अडकला पोलिसांच्या सापळ्यात…

0
3895

आज रात्रीला गडचिरोलीत आणणार…सोनू ठाकूर ला 

गडचिरोली शहरात अल्पावधीत भिशीच्या नावाने उद्योग चालवणारा सोनू ठाकूर हा मागील तीन वर्षांपासून गडचिरोली शहरातील अनेक व्यापाऱ्यांना, अनेक नोकरी वर्ग कर्मचारी, डॉक्टर लोकांना भिशीच्या नावाखाली करोडोचा गंडा घालून, दोन महिन्यापूर्वी गडचिरोली शहरातून फरार झालेला होता. काही लोकांनी आपला पैसा बेकायदेशीर मार्गाने भिशीच्या नावाखाली सोनू ठाकूर कडे गुंतवणूक केल्यामुळे त्याच्या विरोधात कारवाई करू शकले नव्हते. परंतु काही व्यापाऱ्यांनी आपल्या खात्याद्वारे झालेल्या व्यवहाराच्या मदतीने पोलिसात फसवणुकीचा गुन्हा दाखल केलेला होता. त्यानुसार पोलिसांनी आपली तीन चार पथके निर्माण करून सोनू ठाकूरचा शोध घेण्याचा प्रयत्न मागील दीड महिन्यापासून निरंतर चालू ठेवला होता.

 दोन दिवसांपूर्वी अचानक पोलिसांच्या शोध पथकाला सोनू ठाकूर हा उत्तर प्रदेशातील नोएडा या ठिकाणी असल्याचे कळताच,लगेच पोलिसांनी आपला पथक नोएडाला पाठवून सोनू ठाकूरला एका आलेशान फ्लॅटमध्ये लपून असलेल्या ठिकाणी पकडण्यात आले आहे. अजून पर्यंत आरोपी सोनू ठाकूरला पकडल्याचा अधिकृत दुजोरा पोलीस विभागांनी दिलेला नाही, परंतु ज्या पीडित लोकांचे आरोपी सोनू ठाकूर ने पैसे घेतले होते त्यापैकी एका व्यापाऱ्याने आपले नाव न छापण्याच्या अटीवर सोनू ठाकूर हा पोलिसांच्या हाती लागला असून आज रात्री गडचिरोलीला आणणार असल्यााची माहिती दिली  आहे.

 सोनू ठाकूरला गडचिरोलीत आणल्यानंतर पोलीस विभाग कठोर चौकशी करून किती पिडीत व्यापाऱ्यांना न्याय मिळवून देणार याकडे आता लोकांचे लक्ष लागलेले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here