आम आदमी पार्टी नासिककडून महानगरपालिका रस्ते दुरस्तीसाठी अनोखे “भिक मागो आंदोलन”
वडाळा रोड या ठिकांनच्या रस्त्यावर करण्यात आले होते, रस्त्यावरुन जाणाऱ्या येणाऱ्या नागरिकांकडून स्वखुशीने एक रुपया मागण्यात आला,जे पैसे जमा झाले आहेत त्या पैशाचा गल्ला आम आदमी पार्टीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांनी नाशिक महानगरपालिकेच्या हद्दीतील रस्ते लवकरात लवकर दुरस्त व्हावेत यासाठी रस्ते व बांधकाम शहर अभियंता शिवकुमार वंजारी यांना निवेदन देण्यात येणार होते, त्यासाठी कार्यकर्त्यांनी त्यांना भेटण्यासाठी वेळ मागितला होता, त्यांनी वेळ दिला परंतु त्यांनंतर, ते वेळ देवूनही भेटले नाही, सतत दोन दिवस त्यांनी काही कारणास्तव भेट दिली नाही. शेवटी आप तर्फे आज जमा झालेले 211/- रुपये भारतीय पोस्ट मनीऑर्डर ने त्यांना पाठविण्यात आले आहे.
ज्यावेळीही आम आदमी पार्टीच्यां कार्यकर्त्यांनी महानगरपालिकेकड़े रस्ते दुरुस्तीची मागणी केली, त्या त्या वेळी, निधी नसल्याचे अधिकारी यांच्याकड़ून वारंवार सांगण्यात आले. शेवटी व्यवस्थेच्या रटाळ उत्त्तरांना कंटाळून नागरिकांकडून निधी जमा केला आणि तो निधी महानंगरपालिकेच्या रस्ते दुरुस्ती विभागाच्या अधिकारी यांना पाठवून दिला होता.
आम आदमी पार्टी नासिक तर्फे भिख मांगो आंदोलनातून जमा झालेले पैसे शहर अभियंता श्री शिवकुमार वंजारी यांना मनीऑर्डर करून पाठविन्यात आले.
ह्या प्रसंगी आम आदमी पार्टीचे नाशिक-देवळाली विधानसभा अध्यक्ष गिरीष उगले पाटिल, पूर्व विधानसभा अध्यक्ष योगेश कापसे, पदाधिकारी माझीद पठान, स्वप्निल घिया,प्रकाश कनोजे, प्रदीप लोखंडे,अनिल फोकने आणि चंदन पवार उपस्थित होते