कोणसरी प्रोजेक्ट ला गावकऱ्यांची भावनिक साथ….

0
239

जन सुनावणी च्या कार्यक्रमाला सात गावातील नागरिकांचा सहभाग…

गडचिरोली.गडचिरोली जिल्ह्यात पहिल्यांदाच निर्माण होणार असलेल्या कोणसरी गावातील लॉयड मेटल कंपनी च्या 20 हजार कोटींच्या लोह प्रकल्पात भविष्यात प्रदूषण ला रोखण्यासाठी योग्य ती व्यवस्था करण्यात येणार असल्याचे मत आज प्रदूषण महामंडळाने लॉयड मेटल कंपनी कडून जाणून घेतली होती,आज कोणसरी सह सात गावातील नागरिकांना बोलाऊन जन सुनावणी घेण्यात आली होती.

 

झालेल्या जनसुनावणीत नागरिकांनी विचारलेल्या अनेक प्रश्नांची समाधानकारक स्पष्टीकरण देऊन प्रकल्पामुळे बाधित होणाऱ्या कुटुंबातील शिक्षित लोकांना आवश्यक क्षमतेनुसार नौकरी देणार असल्याची माहिती लॉयड मेटल कंपनी चे मालक एम डी प्रभाकरन यांनी दिली होती.

 

या जण सुनावणीच्या कार्यक्रमात जवळपास पाच हजार नागरिक उपस्थित होते,जवळ पासच्या गावातील लोकप्रतिनिधी,सरपंच उपसरपंच,ग्राम पंचायत सदस्य तसेच काही सामाजिक कार्यकर्त्यांनी भविष्यात आपल्या परिसरात कंपनी च्या वतीने,पिण्याच्या पाण्याची सोय,जनावराच्या चाऱ्याची उपलब्धता,तसेच शेतीच्या कामासाठी आवश्यक मदत करण्याची मागणी कंपनी च्या अधिकाऱ्यांसमोर ठेवली असता,प्रत्येक अडीअडचणी सोडविण्यासाठी आपली कंपनी प्रयत्नशील राहणार असल्याची भावना लॉयड मेटल कंपनी चे मालक एम डी प्रभाकरन यांनी व्यक्त केली आहे.

गडचिरोली जिल्ह्याच्या इतिहासात पहिला कारखाना सुरू होत असल्यामुळे प्रदूषण महामंडळाने पारदर्शक पद्धतीने सुनावणी घेतली होती,या सुनावणीत शेकडो लोकांनी आपल्या भावना व्यक्त केल्या असून,प्रत्येक माणसाला कंपनी कडून समाधानकारक उत्तर मिळत असल्याची खात्री प्रदूषण महामंडळाने केली होती.या कार्यक्रमात खासदार अशोक नेते,आमदार डॉ देवराव होळी,माजी आमदार दीपक आत्राम यांच्या सह जिल्हाधिकारी संजय मीना,अतिरिक्त जिल्हाधिकारी धनाजी पाटील,प्रदूषण महामंडळाचे अधिकारी डॉ.हेमा देशपांडे यांची उपस्थिती राहील होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here