मानाच्या गणपती सह बाप्पांचे घरोघरी आगमन…

0
259

मानाच्या गणपती सह बाप्पांचे घरोघरी आगमन..

गडचिरोली.31/8/2022
मागील तीन वर्षांपासून निरंतर कोरोना महामारीचे बंधन असल्यामुळे , सण साजरे करतांना लोकांना मोठ्या प्रमाणात अडचणी निर्माण झालेले दिसून आले होते.या वेळेस सर्व बंधने मुक्त झाल्याने लोकांमध्ये मोठा उत्साह आणि आनंदाचे वातावरण पसरले आहे.

आता  सणासुदीचे दिवस चालू झाले असल्याने प्रशासनाने नियोजन पूर्वक उपाय योजना अंमलात आणण्याचा निर्णय घेतला असल्याने शहरातील बाजारात लोकांची दरवळ वाढलेली आहे.
गडचिरोली नगर पालिकेच्या वतीने एकाच ठिकाणी गणपतीच्या मूर्तीचे विक्री करण्याची परवानगी देण्यात आली होती,त्यामुळे स्थानिक कुंभार लोकांच्या व्यक्तिरिक्त नागपूर,चंद्रपूर जिल्ह्यातील कुंभारांनी सुध्दा मूर्ती विकायला आणल्या होत्या,परंतु आठवडी बाजारात मूर्ती विकण्यासाठी नगर पालिकेने दोन दिवसाचे एक हजार रुपये भाडे वसूल करून मुर्तिकारांना मूर्ती विकण्यासाठी मुभा दिली होती.

जवळ पास चाळीस हजार रुपये भाडे वसूल करण्यात आल्यानंतर सुध्दा पिण्याच्या पाण्याची सोय नगर पालिकेच्या वतीने करण्यात आली नव्हती हे विशेष…

गडचिरोली शहरात गणेश उत्सव आनंदात साजरा करण्याची अनुमती शासनाने दिल्याने मूर्तिकार बाजारातील व्यापारी लोकांची प्रतिक्रिया आनंदाचीच होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here