चुकलेल्याला शिक्षा झालीच पाहिजे कां ? माफ करणार शस्त्र फार ताकदवान असत…… महेशबाबा घुगे.

0
153

प्रबोधन…

 

 

“काम करणाराच चुकत असतो,”

ही म्हण जर आपण मान्य करणार असू तर , चुक करणाराला शिक्षा झालीच पाहिजे असा अट्टाहास आपण धरायला नको. 

कार्यक्षेत्र कोणतही असो, सुरवातीला काम करतांना चुका ह्या होतच असतात,  “आईच्या पोटातून कुणी शिकून येत का? ” मग , सुरवातीला चुका होणारच. अशा प्रयत्नवादी चुका माफ करण , व पुन्हा अशी चुक करु नको, हे समजून सांगण हे यशस्वी प्रशासकाच लक्षण असत. 

झालेली चुक माफ करण, हे मोठ आणि ताकदवान शस्त्र आहे. ज्याच्याकडून चुक झालेली असते तो घाबरलेला असतो. चुकीच प्रायश्चित काय मिळेल याची त्याला भिती वाटत असते. 

चुक करणाराची ही पहीली चुक आहे का? झालेली चुक अनावधानाने झाली आहे की, जाणीवपूर्वक केली आहे. याचा सारा सार विचार करुन निर्णय घेण हे परिपक्व प्रशासकाच लक्षण असत. झालेली चुक माफ करण्यात पुरुषार्थ असतो. चुक माफ करण्याचेही प्रकार असतात। चुक करणारा प्रभावित व्हावा , असा चुक माफीचा प्रकार असला की, चुक करणाराला मिळणारा आनंद, और असतो. अशी चुकमाफी तो आजन्म स्मरणात ठेवतो. चुक माफीच समाधानही तितकच आपल्या मनाच मोठपण सिद्ध करणार असत. अर्थात ,जाणीवपूर्वक चुक करुन ईतरांना अडचणीत आणणाराला मात्र जन्माची अद्दल घडेल अशी शिक्षा करायलच हवी.यातही पुरुषार्थ असतो.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here