खबरी असल्याच्या संशयावरून नक्षलवाद्यांनी केली एका निष्पाप युवकाची निर्घुन हत्या..

0
166

Gadchiroli district highlights..

 

भामरागड…10/3/2023

नक्षलवादी हे टीसीओसी कालावधी दरम्यान सरकारी मालमत्तेचे नुकासान करणे, पोलीस दलावर हल्ले करून त्यांच्या जवळील शस्त्रे लुटून नेणे, रस्ते व इतर प्रकारचे सरकारी कामात अडथळे आणून जाळपोळ करणे इ. देशविघातक कृत्य करत असतात. याच टीसीओसी कालावधीत नक्षलवाद्यांनी पोलीस ख़बरी असल्याच्या संशयावरुन एका युवकाची हत्या केली.

 

सविस्तर वृत्त असे आहे की, उपविभाग भामरागड अंतर्गत येणाऱ्या पोमके नारगुंडा हद्दीतील मौजा मर्दहुर गावातील रहिवासी असलेला युवक नामे साईनाथ नरोटी, वय २६ वर्षे याची दिनांक ०९ मार्च २०२३ रोजी रात्री ९ वाजता चे दरम्यान नक्षलवाद्यांनी गोळी झाडून हत्या केली. मृतक साईनाथ नरोटे हा स्पर्धा परिक्षेची तयारी करत असून, तो होळीनिमीत मर्दहुर आपल्या स्वगावी आला होता. आदिवासी समाजातील साईनाथ नरोटेचे स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून अधिकारी होण्याचे स्वप्न होते. अशा कित्येक युवक युवतींची स्वप्ने नक्षलवाद्यांनी उधळून लावली आहेत. तसेच नक्षलवादी जाणीवपूर्वक आदिवासी युवक युवतींना त्यांच्या स्वप्नाच्या आड येऊन त्यांची प्रगती रोखत आहेत वरुन आम्ही आदिवासी लोकांच्या विकासासाठी काम करीत असल्याचा ते दावा करीत आहेत व आदिवासी युवकांना शिक्षित होण्यापासून आणि चांगले भविष्य मिळविण्यापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न करीत आहेत. सदर गुन्हा पोलीस स्टेशन भामरागड याठिकाणी नोंद केला असून, सदर घटनेचा पुढील तपास पोलीस मदत केंद्र, नारगुंडा करीत आहेत.

 

गडचिरोली जिल्ह्यातील नागरीकांनी नक्षलवाद्यांना कसल्याही प्रकारची मदत करु नये व नागरिकांची सुरक्षा करण्यास गडचिरोली पोलीस दल सक्षम आहे असे आवाहन पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here