Gadchiroli district highlights..13/1/2023
गडचिरोली जिल्ह्यातील धानोरा तालुक्यातील मुरगाव या गावच्या सरपंचाला 75 हजाराची लाच घेतांना रंगेहाथ पकडण्यात लाच प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांना यश मिळाले.
गावातील काँक्रिट रोड कामाचे बिलावर सही करण्यासाठी आरोपी सरपंच मारोती रावजी गेडाम यांनी ठेकेदाराकडून 90 हजाराची लाच मागितलेली होती,परंतु तडजोडी नंतर 75 हजार रुपये घेतांना रंगेहाथ अटक करण्यात आली आहे.
एसीबी चे पोलिस अधीक्षक राहुल माकनिकर यांच्या मार्गदर्शनात लाच प्रतिबंधक विभागाचे पोलिस उप अधीक्षक सुरेंद्र गरड यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई यशस्वी रित्या पार पाडली होती.
सर्व नागरीकांना आवाहन करण्यात येते की,त्यांच्याकडे कोणत्याही शासकीय अधिकारी/कर्मचारी यांनी किंवा त्यांच्या वतीने खाजगी इसम (एजेंट) यांनी कोणतेही शासकीय काम करून देण्यासाठी कायदेशीर फी व्यतिरिक्त अन्य लाचेची मागणी करीत असल्यास तात्काळ सुरेंद्र गरड, पोलीस उपअधीक्षक,यांचेशी
ला.प्र.वि. गडचिरोली मो.क्र. 98226 84895 किंवा टोल फ्रि क्रं. 1064 वर संपर्क साधावा.