Dhule district highlights.15/1/2023
भारत जोडो हा ऊपक्रम राबवतांना, राहुल गांधीचं अहर्निष न थकता चालनं म्हणजे माझ्या दृष्टीने चमत्कारच आहे. त्यांचा हा चमत्कार देशात निश्चित अमुलाग्र क्रांती घडवून आणेल, असे प्रतिपादन , महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे कार्याध्यक्ष, आ. कुणालबाबा पाटील यांनी , धुळ्यात काँग्रेस कार्यकर्त्यांना सबोधतांना केले.
आ.कुणाल पाटील यांच्या अध्यक्षतेखाल व जिल्हाध्यक्ष शाम सनेर यांच्या प्रमुख ऊपस्थितीत , हातसे हात जोडो हे अभियान राबविण्या संदर्भात मार्गदर्शन करण्यासाठी घेण्यात आलेल्या बैठकीत कुणाल पाटील बोलत होते.
राहूल गांधीनी भारत जोडो यात्रेत, भारत वासियांना दिलेला संदेश घरोघरी पोहचविण्यासाठी गावा गावात “हात जोडो अभियान” राबविण्यात येणार असल्याचे जिल्हाध्यक्ष शाम सनेर यांनी सांगितले.
सर्व सामान्य, तळागाळातल्या नागरिकांच्या ह्रदयात कांँग्रेसचे स्थान अढळ आहे , तो पंर्यत , जगातील कोणतीही शक्ती काँग्रेसला देशातून हद्दपार करु शकणार नाही असा आत्मविश्वास काँग्रेसचे जेष्ठ नेते, प्रबोधन व प्रशिक्षण समितिचे जिल्हा समन्वयक बाबासाहेब महेश घुगे यांनी या व्यापक बैठकीला मार्गदर्शन करतांना व्यक्त केला.
धुळे जिल्ह्यात हात जोड अभियान कटाक्षाने राबविले जावे म्हणून सर्वश्री शहराध्यक्ष डॉ. अनिल भामरे, माजी. आमदार डी एस अहीरे, डॉ. दरबारसिंग गिरासे, भानुदास गांगुर्डे, सुनील चौधरी, व्ही यु पाटील, गणेश गर्दे आदीनीही बैठकीला संबोधित केले.
सर्वश्री युवराज करनकाळ, नगर सेवक साबीर शेख, रणजीत पावरा, मनोहर पाटील, पिताबर महाले, मुकुंद कोळवले, माधवराव देवरे, कैलास इखाडे, अशोक खोपडे, गायत्री जयस्वाल, विमल बेडसे, रावसाहेब पवार, भगवान गर्दे, अँड. सुधीर जाधव, बळीराम राठोड, दीपक साळुंखे, बापू सुर्यवंशी, हरिभाऊ आझळकर,बानुबाई शिरसाठ, हरीभाऊ चौधरी, राजेन्द्र खैरनार, गुलाब कोतेकर, साहेबराव खैरनार, गोपाळ देवरे, रतीलाल पाटील, आदी मान्यवरासह जिल्हाभरातील असंख्य काँग्रेस कार्यकर्ते बैठकिला ऊपस्थित होते.