आत्महत्येचे रहस्य अजूनही गुलदस्त्यात….
दिनांक.15/11/2022
धुळे येथे पोलीस निरीक्षकाने गळफास लावुन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना आज दि 15 रोजी सायंकाळी घडली आहे. या घटनेमुळे धुळे पोलिस प्रशासनात
एकच खळबळ उडालेली आहे.
मिळालेल्या प्राथमिक माहिती नुसार धुळे पोलीस प्रशिक्षण केंद्रातील पोलीस निरीक्षक प्रविण कदम यांनी गळफास लावुन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. प्रशिक्षण केंद्रातील शासकीय निवासात गळफास असून आत्महत्येचे कारण मात्र अद्याप समजू शकलेले नाही. घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलीस यंत्रणा घटनास्थळी पोहचलेली होती, घटनास्थळ पंचनामा करून निरीक्षक प्रविण कदम यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी हिरे शासकीय रुग्णालयात हलविण्यात आला आहे.
पोलीस निरीक्षक प्रवीण कदम हे गेल्या तीन वर्षांपासून धुळे येथे नियुक्त होते या घटनेमुळे पोलीस दलात हळहळ व्यक्त केली जात आहे.