आम्हाला शासकीय स्तरावरुन वस्तुस्थिती जाणून घ्यायची आहे….   महेशबाबा घुगे

0
341

 

धुळे.9/11/2022

लोक संघर्षा नंतर , केंद्र शासनाने, रेल्वे मंत्रालयाने, मनमाड धुळे इंदोर रेल्वे मार्गाला मान्यता दिली, त्यावर, त्या मार्गाच्या कामाचे भूमी पूजन, तत्कालीन रेल्वे मंत्री, सरेश प्रभू आणि भारताचे  पंतप्रधान नरेद्र मोदी यांनी करुन , तथा, या मार्गाचे काम जवाहरलाल नेहरु पोर्ट ट्रस्ट द्वारा केले जाणार असे ना नितीन गडकरी यांनी जाहिर, करुन, मनमाड इंदोर रेल्वे मार्गाच्या मान्यतेवर शिक्कामोर्तब केले हे आम्हालाही मान्य आहेच, पण या कामाची आजची स्थिती काय आहे, हे आम्हाला, अर्थात समस्त नागरिकांना, शासकीय स्तरावर, मा. जिल्हाधिकारी साहेबा कडून जाणून घ्यायचे आहे.

त्यासाठीच , आम्ही 4 नोव्हेंबर 2022 रोजी, नागरी हक्क संरक्षण समितीच्या वतीने जिल्हाधिकारी मा. जलज जी शर्मा साहेब,यांना निवेदन दिले आहे व त्यांच्या अधिक्रुत शासकीय ऊत्तराची आम्ही वाट पहात आहोत.

महेश घुगे.

ज्येष्ठ पत्रकार तथा सरचिटणिस नागरी हक्क संरक्षण समिती, धुळे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here