वेग वर्धित योजनेच्या नावाखाली देण्यात येणाऱ्या पदोन्नतीमुळे जनरल कर्तव्य बजावत असलेल्या  पोलिसांवर अन्याय..

0
1014

Gadchiroli district highlights..5/11/2022
गडचिरोली जिल्ह्यातील पोलिस अंमलदार यांना पोलिस हवालदार पदावर व पोलिस हवालदार यांना सहायक फौजदार या पदावर पदोन्नती देताना सेवा ज्येष्ठता यादीचा विचार न करता अभियान पथकातील काम करणाऱ्या कनिष्ठ कर्मचाऱ्यांना सुध्दा वेग वर्धित योजनेखाली सेवेने ज्येष्ठ असलेल्या कर्मचाऱ्या पेक्षा त्याच कोट्यातून कनिष्ठ कर्मचाऱ्यांना पदोन्नती देण्यात येत आहे,त्यामुळे ज्येष्ठ असलेल्या कर्मचाऱ्यांची पदोन्नती वर्षानुवर्ष सतत रखडलेली आहे.

अभियान पथकातील कर्मचाऱ्यांना पदोन्नती देताना वेगळ्या कोट्यातून देण्यात यावी अशी मागणी कर्मचारी करीत आहेत.सेवा ज्येष्ठता यादीचा विचार करून पदोन्नती दिल्यास जनरल कर्तव्य बजावत असलेल्या कर्मचाऱ्यांवर अन्याय होणार नाही याचा विचार पोलिस विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी करायला हवा असे यावरुन वाटू लागले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here