बोलेरोच्या धडकेत नेपाळी गोरखा जागीच ठार…

0
621

Gadchiroli district highlights..25/10/2022

गडचिरोली शहरातील गजबजलेल्या धानोरा रोड वरील रिलायन्स मॉल च्या अगदी जवळ बोलेरो वाहनाच्या धडकेत जबर धडक एका नेपाळी गोरखा जागीच गतप्राण झाल्याची घटना काल दुपारी साढेचार वाजताच्या दरम्यान घडली.

सदर व्यक्तीला जोराची धडक देऊन बोलेरो वाहनाच्या चालकाने अपघात स्थळावरून पळ काढला असून,सदर बोलेरो वाहन हे इंदिरा नगर येथे राहणाऱ्या विनोद कूनघाडकर यांचे असून, तो गडचिरोली नगर पालिकेच्या माजी नेत्याचा नातेवाईक असल्याचे प्रत्यक्षदर्शी लोकांनी सांगितले आहे.परंतु पोलिसांनी आज सायंकाळ पर्यंत सदर वाहनाला जप्त केले नव्हते हे विशेष…

मृतकाचे नाव दीर्घा ठकुला वय 43 वर्ष असून हा गडचिरोली शहरात रात्रीला गस्त घालणाऱ्या गोरख्याचा नातेवाईक होता.अपघाताच्या घटनास्थळी पोलिस यंत्रणा वेळेवर पोहचली नसल्याने काही जागरूक नागरिकांनी 108 क्रमांकावर संपर्क करून रुग्णवाहिका उपलब्ध करून दिली होती.परंतु प्रकृती गंभीर होऊन सायंकाळी त्याचा मृत्यू सामान्य रुग्णालयात झाला होता.

मृतदेह शवविच्छेदनासाठी सामान्य रुग्णालयात पाठविण्यात आले असल्याची माहिती सूत्रांनी दिली होती.

सदर घटनेची माहिती जाणून घेतली असता लवकरच धडक देणाऱ्या वाहन चालकावर कारवाई करण्यात येणार असून,वाहन जप्त करण्यात येणार असल्याची माहिती पोलिस निरीक्षक अरविंद कतलाम यांनी दिली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here