माजी मंत्री विजय वडेट्टीवार पोहचले आपल्या सच्या कार्यकर्त्याची प्रकृती पाहायला…

0
816

Gadchiroli district highlights…25/10/2022

गडचिरोली जिल्ह्यातील धानोरा तालुक्यातील काँग्रेस पक्षाचा एक निष्ठ धडाडीचा कार्यकर्ता मल्लिक बुधवानी यांना हृदयविकाराचा धक्का आला होता,त्यावेळी वेळेवर गडचिरोली सामान्य रुग्णालयात प्राथमिक उपचार मिळाल्याने ,त्यांची प्रकृती स्थिर करून त्यांना हृदयाची तपासणी करण्यासाठी नागपूर येथील रुग्णालयात पाठविण्यात आले होते.

नागपूर येथील रुग्णालयात तपासणीत ह्रुदयात काही ब्लॉकेज असल्याचे दिसून आल्यानंतर डॉक्टरांनी ताबडतोब हृदयाची शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला आणि परवाच त्यांना नागपूर रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला असून, त्यांना जवळ पास एक महिन्याचा कालावधी घरीच आराम करण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला होता.

माजी मंत्री विजय वडेट्टीवार यांना मल्लिक बुधवानी यांच्या प्रकृती स्थिती कळताच त्यांनी आपल्या सच्या कार्यकर्त्याची प्रकृती पाहायला त्यांच्या बसेरा कॉलनी येथील राहत्या घरी आज दुपारी भेट देऊन तब्येतीची विचारपूस केली.

आपल्या धडाडीच्या कार्यकर्त्याची प्रकृती स्थिर असल्याचे दिसून आल्यानंतर विजय वडेट्टीवार यांनी मलिक बुधवानी यांची गळाभेट घेतली होती,यावेळी वडेट्टीवार यांना अश्रू अनावर झाले होते.  डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार आपण घरीच आराम करावा अशी सूचना त्यांनी मलिक यांना आत्मीयतेने केलीी, यावेळी काँग्रेस चे नेते हसनभाई गिलानी सुध्दा उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here