नरभक्षक वाघाने आज पुन्हा एका व्यक्तीचा घेतला बळी…

0
1145
वन विभागाच्या विरोधात नागरिकांचा आक्रोश…
गडचिरोली. (11ऑक्टोंबर)आरमोरी तालुक्यातील रवी या गावात ठिकाणी नरभक्षक वाघाने जंगलात गेलेल्या एका व्यक्तीचा शिकार केल्याची घटना आज सकाळी आठ वाजता घडली.
वाघाच्या हल्यात ठार झालेल्या व्यक्तीचे नाव पुरुषोत्तम सावसाकडे वय 35 वर्ष रा.रवी असे असून तो काड्या आणायला जंगल परिसरात गेला होता.
वडसा, आरमोरी तालुक्यात मागील पाच दिवसात वाघाने तिसऱ्या व्यक्तीचा शिकार केल्याची घटना घडलेली असून या नरभक्षक वाघाला जेरबंद कधी करणार असा मार्मिक आर्त स्वर लोकांमध्ये होतांना दिसत आहे.या घटनेची माहिती मिळताच पोलिस यंत्रणा आणि वन विभागाची यंत्रणा घटनास्थळी पोहचलेली होती घटनास्थळ पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी सामान्य रुग्णालयात पाठविण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here