Home ब्रेकिंग न्यूज पैसा, प्रेमसंबंध आणि वासनेतून पतीचा खून… पत्नीने प्रियकरासोबत संगनमत करून पतीची...

पैसा, प्रेमसंबंध आणि वासनेतून पतीचा खून… पत्नीने प्रियकरासोबत संगनमत करून पतीची निर्घृण हत्या…

0
568

 

गडचिरोली | कुरखेडा —

गडचिरोली जिल्ह्यातील कुरखेडा शहरात नातेसंबंधांना काळीमा फासणारी आणि समाजाला हादरवून टाकणारी धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. पैसा, बेकायदेशीर प्रेमसंबंध आणि वासना यांच्या भोवऱ्यात अडकून एका तरुणाची अत्यंत निर्घृणपणे हत्या करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. पत्नीने आपल्या प्रियकरासोबत संगनमत करून पतीचा खून केल्याचा आणि नंतर हा प्रकार रस्ते अपघात असल्याचे भासवण्याचा प्रयत्न केल्याचा गंभीर आरोप पोलिस तपासात स्पष्ट झाला आहे.

ही घटना ३० डिसेंबर २०२५ रोजी मध्यरात्री सुमारे १ वाजण्याच्या सुमारास घडली. मृतकाचे नाव दिनेश सूर्यभान डोंगरवार (वय ३३, रा. गेवरधा) असे आहे. या प्रकरणी पोलिसांनी मृतकाची पत्नी रेखा दिनेश डोंगरवार (वय २८) व तिचा प्रियकर विश्वा कराडे (वय २५, रा. भरनुली) यांना अटक केली आहे.

शासनाकडून मिळालेली मदत ठरली वादाचे कारण…

दिनेश व रेखा यांचा आंतरजातीय विवाह झाला होता. या विवाहानंतर शासनाच्या योजनेअंतर्गत दांपत्याला सुमारे अडीच लाख रुपयांची आर्थिक मदत मिळाली होती. हीच रक्कम पती-पत्नीतील वादाचे मूळ ठरली. रेखा या रकमेतील निम्मा हिस्सा मागत होती; मात्र दिनेशने नकार दिल्याने सतत वाद होत होते. हा वाद तिने आपल्या प्रियकराला सांगितल्यानंतर खुनाचा कट रचण्यात आला.

मध्यरात्री घरातच घडला रक्तरंजित प्रकार…

३० डिसेंबरच्या रात्री प्रियकर विश्वा कराडे घरात उपस्थित होता. याचवेळी पती-पत्नीमध्ये वाद झाला आणि तो हिंसक स्वरूपात बदलला. आरोपानुसार, रेखा व विश्वा यांनी संगनमत करून प्रथम दिनेशच्या गळ्यावर चाकूने वार केला. त्यानंतर फरशीच्या टोकदार तुकड्याने वार करत त्याची जागीच हत्या करण्यात आली.

अपघाताचा बनाव; पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न…

खून केल्यानंतर दोन्ही आरोपींनी घरातील रक्त पाण्याने धुवून पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर मृतदेह दुचाकीवर टाकून कुरखेडा शहरालगतच्या सती नदी परिसरात रस्त्याच्या कडेला टाकण्यात आला, जेणेकरून हा प्रकार रस्ते अपघात वाटावा.

ही हत्या कुरखेडा येथील राणा प्रताप वॉर्डमध्ये प्रतिभा बोरकर यांच्या मालकीच्या भाडेघरात घडली. संशयास्पद मृत्यूची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी पोलिसांना कळवले.

दोन्ही आरोपी अटकेत; पोलीस तपास सुरू…

कुरखेडा पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून तपास सुरू केला असून दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली आहे. त्यांच्यावर कलम 103(1), 338(a), 3(5) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संपूर्ण प्रकरणाचा तपास एसडीपीओ रविंद्र भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक महेंद्र वाघ व त्यांची टीम करत आहे.

कुरखेडा शहरात खळबळ…

या अमानुष हत्येच्या घटनेमुळे संपूर्ण कुरखेडा शहरात भीती व संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. विश्वास, नाते आणि माणुसकीला काळीमा फासणारी ही घटना असल्याची प्रतिक्रिया नागरिकांकडून व्यक्त होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here