Home राजकीय गडचिरोलीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कडून नगर परिषदांतील भाजपच्या यशाचे कौतुक; नवनिर्वाचित...

गडचिरोलीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कडून नगर परिषदांतील भाजपच्या यशाचे कौतुक; नवनिर्वाचित नगराध्यक्षांचा सत्कार…

0
151

 

आगामी जिल्हा परिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींवर सखोल चर्चा…

गडचिरोली : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शनिवारी सायंकाळी गडचिरोली दौऱ्यावर असताना पोलिसांच्या अतिथीगृहात जिल्ह्यातील भाजपच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांसोबत सविस्तर चर्चा केली. जिल्ह्यातील गडचिरोली, आरमोरी व देसाईगंज या तिन्ही नगर परिषदांमध्ये भाजपने मिळवलेल्या स्पष्ट वर्चस्वाबद्दल मुख्यमंत्री फडणवीस यांनी समाधान व्यक्त केले. नवनिर्वाचित नगराध्यक्षांचे अभिनंदन करत त्यांनी नागरिकाभिमुख, पारदर्शक आणि विकासाभिमुख कारभार करण्याच्या शुभेच्छा दिल्या.

या बैठकीस ज्येष्ठ सहकार नेते अरविंद सावकार पोरेड्डीवार, प्रकाश सावकार पोरेड्डीवार, माजी आमदार कृष्णा गजबे, माजी आमदार डॉ. देवराव होळी, भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष व निवडणूक प्रमुख प्रशांत वाघरे, भाजप व्यापारी आघाडीचे जिल्हाध्यक्ष आकाश अग्रवाल, देसाईगंज नगर परिषदेचे माजी उपाध्यक्ष मोतीलाल कुकरेजा यांची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी नवनिर्वाचित नगराध्यक्ष प्रणोती निंबोरकर (गडचिरोली), रुपेश पुणेकर (आरमोरी) आणि लता सुंदरकर (देसाईगंज) तसेच सागर निंबोरकर यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांचे गुलाबपुष्प देऊन स्वागत केले. मुख्यमंत्री फडणवीस यांनी सर्व नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करत विकासकामांना गती देण्याचे व जनतेच्या अपेक्षा पूर्ण करण्याचे आवाहन केले.

बैठकीदरम्यान मुख्यमंत्री फडणवीस यांनी आगामी जिल्हा परिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील राजकीय वातावरण, संघटनात्मक बांधणी तसेच सध्याच्या घडामोडींवर भाजप पदाधिकाऱ्यांसोबत सखोल चर्चा केली. स्थानिक पातळीवरील प्रश्न, विकास प्रकल्प, नागरिकांच्या समस्या आणि संघटन मजबूत करण्याबाबत मार्गदर्शन करत त्यांनी आगामी निवडणुकांसाठी सज्ज राहण्याचा संदेश दिला.

या दौऱ्यामुळे जिल्ह्यातील भाजप कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून, आगामी काळात विकास व संघटनात्मक कामांना अधिक वेग मिळणार असल्याचे संकेत मिळत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here