Home राजकीय सोनापूर प्रभाग क्रमांक 11 : अभियंता लिलाधर भरडकर यांच्या उमेदवारीला मतदारांचा एकतर्फी...

सोनापूर प्रभाग क्रमांक 11 : अभियंता लिलाधर भरडकर यांच्या उमेदवारीला मतदारांचा एकतर्फी कौल! विकासकामांची भक्कम नोंद आणि सततच्या जनसेवेच्या आधारावर भरडकर आघाडीवर…

0
407

 

गडचिरोली :

गडचिरोली–चंद्रपूर मार्गावरील सोनापूर प्रभाग क्रमांक 11 मधील आगामी नगरपालिका निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे आमदार राजे धर्मराव बाबा आत्राम यांच्या मार्गदर्शनाखाली उमेदवारी अर्ज दाखल केलेले अभियंता लिलाधर भरडकर हे मतदारांच्या पसंतीचे उमेदवार ठरत असल्याचे प्रत्यक्ष पाहायला मिळत आहे. प्रभागातील विविध वसाहतींमध्ये मिळणारा उत्स्फूर्त पाठिंबा, विरोधी पक्षांचा तगडा उमेदवार नसणे आणि गेल्या काही वर्षांत झालेले विकासकामांचा भक्कम वारसा लक्षात घेता भरडकर यांचा एकतर्फी विजय जवळपास निश्चित असल्याचे राजकीय चर्चांमधून स्पष्ट झाले आहे.

 

 

स्थानिक मुलगा – शैक्षणिक प्रवास, संघटनात्मक कामगिरी व राजकीय स्थिरता…

 

लिलाधर भरडकर हे जन्मापासून सोनापूर प्रभागातीलच रहिवासी. त्यांनी प्राथमिक शिक्षण नगरपालिकेच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्राथमिक शाळेत घेतले, तर महाविद्यालयीन शिक्षण महा महाविद्यालयात पूर्ण केले. विद्यार्थ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी ते नेहमी पुढे राहत आणि त्यामुळेच ते महाविद्यालयीन काळात राष्ट्रवादी विद्यार्थी संघाचे प्रमुख नेतृत्व बनले.

 

सिव्हिल इंजिनिअरिंगचे शिक्षण घेतल्यानंतर त्यांनी १५ वर्षांपासून सातत्याने राष्ट्रवादी काँग्रेसमध्येच काम केले. पक्षनिष्ठा, प्रामाणिक कार्यशैली आणि कोणत्याही लालसेला बळी न पडण्याच्या भूमिकेमुळे त्यांची प्रतिमा स्वच्छ आणि विश्वासार्ह नेता म्हणून निर्माण झाली. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या शहराध्यक्षपदाची जबाबदारीही समर्थपणे पार पाडली आहे.

 

कोविड काळातील जीवाची पर्वा न करता केलेली सेवा…

 

कोरोना महामारीच्या अत्यंत कठीण काळात भरडकर यांनी युवकांच्या टीमसह हजारो स्थलांतरित व गरजू नागरिकांना मदत केली.त्यांना अन्न धान्यापासून तर रुग्णांना उपचार केंद्रांपर्यंत पोहोचवणे, अडकलेल्या कुटुंबांना औषधोपचार व आवश्यक साहित्य देणे, तसेच शहरभर वितरित केलेल्या सेवाकार्यामुळे लोकांच्या मनात भरडकर यांच्याबद्दल मोठी कृतज्ञता आणि आदर निर्माण झाला.

 

गडचिरोलीतील पोलीस भरतीदरम्यान जिल्ह्याच्या दुर्गम भागातून आलेल्या जवळपास ८ ते ९ हजार युवकांना त्यांच्या स्वतःच्या खर्चातून, राहण्याची सोय,जेवणाची व्यवस्था,भरती स्थळापर्यंत मोफत वाहतूक उपलब्ध करून देण्याचा उपक्रम त्यांनी राबविला. युवकांमध्ये त्यांच्या या मदतीबद्दल प्रचंड विश्वास आणि आदर निर्माण झाला.

 

सोनापूर प्रभागातील विकासकामांची दणदणीत कामगिरी – ५ कोटींच्या कामांना मंजुरी…

 

सोनापूर प्रभाग क्रमांक 11 हा शहरातील सर्वाधिक लोकसंख्या व क्षेत्रफळ असलेला प्रभाग असून सुमारे ४२०० मतदार येथे राहतात. बजरंग नगर, पंचवटी नगर, गणेश नगर, रेव्हेन्यू कॉलनी, कलेक्टर कॉलनी यांसारख्या वसाहती या प्रभागात आहेत.

भरडकर यांच्या पुढाकारातून आणि आमदार आत्राम यांच्या पाठबळातून, चार ठिकाणी खुले व्यायाम साहित्य बसविण्यात आले

युवकांसाठी क्रीडा सुविधा व आरोग्यविषयक उपक्रम,सुमारे पाच कोटी रुपयांची महत्त्वाची विकासकामे मंजूरी,रस्ते, नाले, पाणीपुरवठा, प्रकाशयोजना यांसारखी प्रलंबित कामे पूर्णत्वास नेलेली आहे.

18 महिन्यांच्या कालावधीत जिल्हा नियोजन समिती सदस्य म्हणून प्रभावी कार्य कार्यकाळ पूर्ण केला ही विशेष बाब आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here