औषधांशिवाय विविध आजारांवर नैसर्गिक उपचार; १४ ते २० नोव्हेंबरपर्यंत शिबिर सुरू; नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग…
गडचिरोली (प्रतिनिधी) :
रोटरी क्लब ऑफ गडचिरोलीतर्फे “THE MAGIC OF ROTARY” या विशेष उपक्रमांतर्गत एक्युप्रेशर, वायब्रेशन, सुजोक चिकित्सा आणि फिजिओथेरपी उपचार शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. नागरिकांना औषधांशिवाय नैसर्गिक पद्धतीने उपचार देत आरोग्यदायी समाजनिर्मितीचे उद्दिष्ट या उपक्रमामागे आहे.
हे शिबिर १४ नोव्हेंबर ते २० नोव्हेंबर २०२५ या कालावधीत पार पडणार असून, नागरिकांचा त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.
शिबिराचे आयोजन एक्युप्रेशर रिसर्च ट्रेनिंग अँड ट्रीटमेंट इन्स्टिट्यूट, जोधपूर (राजस्थान) व फिजिओथेरेपिस्ट नॅचरोपॅथी रिसर्च ट्रीटमेंट पंजीकृत संस्था, जोधपूर यांच्या तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले आहे.
अनेक आजारांवर औषधांशिवाय उपचार…
या शिबिरात कमरेचा त्रास, खांद्याचे दुखणे, सांधेदुखी, सर्वाइकल, सायटिका, लठ्ठपणा, शुगर, ब्लडप्रेशर, थायरॉईड, दमा, मुळव्याध, गॅस्ट्रिक त्रास, डोकेदुखी, डोळ्यांचे आजार, हात-पायांना मुंग्या येणे, मानसिक ताण, झोप न लागणे इत्यादी आजारांवर नैसर्गिक उपचार करण्यात येत आहेत.
प्रत्येक रुग्णावर दररोज १५ ते २० मिनिटांचा उपचार सत्र घेतले जात असून, कोणतेही औषध न वापरता पूर्णपणे एक्युप्रेशर व सुजोक तंत्राचा वापर केला जात आहे.
फिजिओथेरपी कॅम्पमध्ये आधुनिक जर्मन टेक्निकचा वापर…
फिजिओथेरपी कॅम्पमध्ये जर्मन टेक्निकने विकसित केलेल्या “KNEE BRACE” च्या माध्यमातून गुडघेदुखीवर ऑपरेशनशिवाय उपचार केले जात आहेत. याशिवाय कमरेचा त्रास, सांधेदुखी, थायरॉईड, कब्ज, मोटापा, शुगर, झोप न लागणे, हात-पाय सुन्न होणे अशा विविध समस्यांवर उपचार दिले जात आहेत.
१४ ते २० नोव्हेंबरपर्यंत चालणार शिबिर – शुल्क फक्त ₹३००/-
हे आरोग्य शिबिर १४ नोव्हेंबर ते २० नोव्हेंबर २०२५ या सात दिवसांच्या कालावधीसाठी आयोजित करण्यात आले आहे.
नोंदणी शुल्क फक्त ₹३००/- ठेवण्यात आले असून, उपचारासाठी वेळ सकाळी ८ ते १२ आणि सायंकाळी ४ ते ८ अशी आहे.
साई मंदिर, डॉ. कुंभारे यांच्या दवाखान्याच्या मागे, चामोर्शी रोड, गडचिरोली येथे दररोज शेकडो नागरिक आरोग्य तपासणी आणि नैसर्गिक उपचाराचा लाभ मिळवण्यासाठी येणार असल्याचे सांगण्यात आले आहेत.
📞 नोंदणीसाठी संपर्क
थ. राजेंद्र सारण (D.A.T. in Acu.) – 📱 9024635089
रोट. निरज जैन – 📱 9422154955
रोट. अमित सुचक – 📱 9422154863
स्पॉट रजिस्ट्रेशन : रोट. राकेश चडगुलवार – 📱 9404535111
रोटरी क्लबचा आरोग्यदायी उपक्रम समाजहितासाठी…
रोटरी क्लब ऑफ गडचिरोली नेहमीच सामाजिक, आरोग्यविषयक आणि जनहिताचे उपक्रम राबवत असतो.
“द मॅजिक ऑफ रोटरी” या मोहिमेद्वारे नागरिकांना नैसर्गिक उपचारांची जाणीव करून देत, औषधमुक्त व निरोगी जीवनशैलीकडे वाटचाल करण्याचा संदेश दिला जात आहे.
क्लबने सर्व नागरिकांना या शिबिराचा लाभ घेण्याचे आवाहन केले आहे.




