अस्तित्वाच्या संघर्षात जो सोबत राहतो, तोच आपला; GR ला समर्थन करणारे आणि त्याच्या विरोधात न बोलणारे सर्व आपले विरोधक…

0
61

अस्तित्वाच्या संघर्षात जो सोबत राहतो, तोच आपला; GR ला समर्थन करणारे आणि त्याच्या विरोधात न बोलणारे सर्व आपले विरोधक

 

गडचिरोली:१० ऑक्टोबर रोजी गडचिरोलीत नागपूरमध्ये होणाऱ्या सकल ओबीसी महामोर्चाची नियोजन बैठक आज शहरातील कात्रटवार मंगल कार्यालयात पार पडली. या बैठकीत आमदार विजय वडेट्टीवार सहभागी झाले आणि ओबीसी समाजाच्या शेकडो ओबीसी बांधवांशी संवाद साधला. या वेळी त्यांनी सांगितले की, राज्य सरकारने २ सप्टेंबरला एका काळ्या GR जारी करून ओबीसी समाजाच्या अस्तित्वावरच घाला घातला आहे. आधीच संघर्षरत असलेल्या ओबीसी समाजाचे आरक्षण संपविण्याचे षडयंत्र रचले जात आहे.

 

माझ्या ओबीसी बांधवांच्या भविष्यासाठी मी येथे नेता म्हणून नाही, तर समाजातील एक छोटासा कार्यकर्ता म्हणून सहभागी झालो आहे. या लढाईत जो सोबत असेल, जो GR रद्द करण्यासाठी प्रयत्न करेल, तोच आपला हे समाजाने ठरवले पाहिजे.

 

सत्तेतला असो किंवा विरोधक, प्रत्येक लोकप्रतिनिधीकडून हा GR रद्द करण्यासाठी पत्र घेणे गरजेचे आहे. त्यांना या संघर्षात सहभागी करून घ्या आणि हा लढा यशस्वी करा.

 

माझा कोणत्याही व्यक्तीशी किंवा समाजाशी विरोध नाही. मात्र आधीच ३५० पेक्षा जास्त जात ओबीसी प्रवर्गात असून, यामध्ये नव्याने प्रवेश केल्यास लहान समाजाला न्याय मिळेल का हा खरा प्रश्न आहे. त्यांचे अस्तित्वच संपून जाईल. ते नोकरीत, शिक्षणात आणि राजकारणात दिसणार नाहीत, हे लक्षात घेणे आवश्यक आहे.

 

त्यामुळे आपली सर्व कामे बाजूला ठेवून, १० ऑक्टोबरला होणाऱ्या अस्तित्वाच्या या सकल ओबीसी महामोर्चात सर्वांनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आमदार विजय वडेट्टीवार यांनी आवाहन केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here