६ वरिष्ठ जहाल माओवाद्यांनी महाराष्ट्र पोलीस महासंचालक श्रीमती रश्मि शुक्ला यांच्यासमोर आत्मसमर्पण केले…

0
430
filter: 0; fileterIntensity: 0.0; filterMask: 0; captureOrientation: 0; algolist: 0; multi-frame: 1; brp_mask:0; brp_del_th:null; brp_del_sen:null; motionR: 0; delta:null; module: video;hw-remosaic: false;touch: (-1.0, -1.0);sceneMode: 0;cct_value: 0;AI_Scene: (-1, -1);aec_lux: 269.474;aec_lux_index: 0;albedo: ;confidence: ;motionLevel: 0;weatherinfo: null;temperature: 39;

 

गडचिरोली: भिमन्ना ऊर्फ सुखलाल ऊर्फ व्यंकटेश मुत्तय्या कुळमेथे आणि त्याची पत्नी विमलक्का सडमेक यासह एक कमांडर, दोन पीपीसीएम व एक एसीएम पदावरील एकूण ६ माओवाद्यांनी आज राज्याच्या पोलिस महासंचालक रश्मी शुक्ला यांच्या समक्ष आत्मसमर्पण केले.

 

महाराष्ट्र शासनाने त्यांच्यावर एकत्रितपणे एकूण ६२ लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले होते.

 

गडचिरोली पोलीस व सिआरपीएफ यांच्या संयुक्त प्रयत्नांमुळे २०२५ मध्ये आतापर्यंत एकूण ४० माओवाद्यांनी आत्मसमर्पण केले आहे.

 

माओवादविरोधी अभियानात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या अपर पोलीस अधीक्षक (अभियान) व अपर पोलीस अधीक्षक अहेरी तसेच सी-६० अधिकारी व जवानांचा सत्कार करण्यात आला.

 

मान्यवरांच्या हस्ते नक्षल प्रभावित कुटुंबियांना धनादेशाचे वितरण करण्यात आले.

 

अतिसंवेदनशील नव्याने स्थापन झालेल्या पोस्टे कवंडे येथे पोलीस महासंचालकांनी भेट देऊन जवानांशी संवाद साधला.

 

 

महाराष्ट्र राज्याच्या पोलीस महासंचालक श्रीमती रश्मि शुक्ला यांच्यासह मा. अपर पोलीस महासंचालक (विशेष कृती) डॉ. छेरिंग दोरजे यांनी गडचिरोली जिल्ह्याचा दौरा २४/०९/२०२५ रोजी केला. सन २००५ पासून जाहीर केलेल्या आत्मसमर्पण योजनेमुळे आणि हिंसाचारातून कंटाळलेल्या वरिष्ठ माओवाद्यांसह अनेक जहाल माओवाद्यांनी पोलीसांसमोर आत्मसमर्पण केले आहे. पोलीस दलाच्या पुनर्वसनामुळे आतापर्यंत एकूण ७१६ माओवाद्यांनी गडचिरोली पोलीस दलासमोर आत्मसमर्पण केले आहे.

 

आज आत्मसमर्पण करणाऱ्या वरिष्ठ माओवाद्यांची नावे व माहिती:

 

1. भिमन्ना ऊर्फ सुखलाल ऊर्फ व्यंकटेश मुत्तय्या कुळमेथे (डिव्हीसीएम, उत्तर बस्तर डिव्हीजन मास टीम) – वय ५८ वर्षे, रा. करंचा, ता. अहेरी, जि. गडचिरोली.

 

 

2. विमलक्का ऊर्फ शंकरअक्का विस्तारय्या सडमेक (डिव्हीसीएम, माड डिव्हीजन, डीके प्रेस टीम इंचार्ज) – वय ५६ वर्षे, रा. मांड्रा, ता. अहेरी, जि. गडचिरोली.

 

 

3. कविता ऊर्फ शांती मंगरु मज्जी (कमांडर, पश्चिम ब्युरो टेलर टीम) – वय ३४ वर्षे, रा. पडतानपल्ली, ता. भामरागड, जि. गडचिरोली.

 

 

4. नागेश ऊर्फ आयताल गुड्डी माडवी (पीपीसीएम, कंपनी क्र. १०) – वय ३९ वर्षे, रा. पामरा, ता. भैरामगड, जि. बीजापूर (छ.ग.).

 

 

5. समीर आयतू पोटाम (पीपीसीएम, दक्षिण ब्युरो टेक्नीकल टीम) – वय २४ वर्षे, रा. पुसणार, ता. गंगालूर, जि. बीजापूर (छ.ग.).

 

 

6. नवाता ऊर्फ रुपी ऊर्फ सुरेखा चैतू मडावी (एसीएम, अहेरी दलम) – वय २८ वर्षे, रा. नैनेर, ता. अहेरी, जि. गडचिरोली.

 

 

याच वर्षी ०१ जानेवारी २०२५ रोजी दंडकारण्य स्पेशन झोनल कमिटीची सदस्य ताराक्का सिडाम यासह ११ जहाल माओवाद्यांनी, तसेच ०६ जून २०२५ रोजी डिव्हीसीएम सपनाक्का बुचय्या चौधरीसह १२ जहाल माओवाद्यांनी मुख्यमंत्री व गृहमंत्री महाराष्ट्र राज्यांच्या समोर आत्मसमर्पण केले होते. यामुळे गडचिरोली आणि संपूर्ण दंडकारण्य विभागातील माओवादी चळवळीला मोठा धक्का बसला होता.

पोलीस महासंचालक श्रीमती रश्मि शुक्ला यांनी पोलीस मुख्यालयातील कार्यक्रमात माओवादविरोधी चकमकीत उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या अधिकारी व जवानांचा सत्कार केला. तसेच माओवाद्यांनी हिंसेचा त्याग करून लोकशाहीच्या मुख्य प्रवाहात सामील होण्याचे आवाहन केले.

 

आत्मसमर्पित माओवाद्यांच्या बक्षीसाची माहिती:

 

भिमन्ना – १६ लाख रुपये, पुनर्वसनासाठी ८.५ लाख रुपये.

 

विमलक्का – १६ लाख रुपये, पुनर्वसनासाठी ८.५ लाख रुपये.

 

कविता – ८ लाख रुपये, पुनर्वसनासाठी ५.५ लाख रुपये.

 

नागेश – ८ लाख रुपये, पुनर्वसनासाठी ५ लाख रुपये.

 

समीर – ८ लाख रुपये, पुनर्वसनासाठी ४.५ लाख रुपये.

 

नवाता – ६ लाख रुपये, पुनर्वसनासाठी ४.५ लाख रुपये.

 

पती-पत्नी आत्मसमर्पणावर अतिरिक्त १.५ लाख रुपये.

 

गटाने आत्मसमर्पण केल्यास एकत्रित मदत ४ लाख रुपये.

 

 

गडचिरोली पोलीस दलाने प्रभावी माओवादविरोधी अभियान राबविल्यामुळे सन २०२२ ते आतापर्यंत एकूण ७३ जहाल माओवाद्यांनी आत्मसमर्पण केले असून, त्यापैकी २०२५ मध्ये आतापर्यंत ४० माओवाद्यांनी आत्मसमर्पण केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here