भरधाव कार च्या धडकेत 1 मृत्यू तर एक महिलेसह 3 गंभीर जखमी…

0
2687

गडचिरोली:गडचिरोली मुख्यालयापासून 14 किमी अंतरावर चामोर्शी रोडवर असलेल्या गोविंदपूर या गावात एक भरधाव कार तीन मोटर सायकल स्वरांना जोरदार धडक दिल्याने एक मृत्यू तर 1 महिले सह 3 जण गंभीर जखमी झाल्याची घटना आज दुपारी 1वाजता घडली.

 

या घटनेची सविस्तर माहिती घेतली असता एक शेवरलेट कंपनी ची कार चामोर्शी कडून गडचिरोली कडे येत असताना अचानक चालकाचे नियंत्रण सुटल्याने उभ्या असलेल्या तीन मोटर सायकल स्वरांना जोरदार धडक देताच एक व्यक्ती जागीच ठार झाला आणि एक व्यक्ती या धडकेने आपली दुचाकी घेऊन सरळ रोड च्या बाजूला असलेल्या शेतात जाऊन पडला.

या अपघातात मृत पावलेल्या व्यक्तीचे नाव विजय सुखदेव सातपुते वय 48 रा. गोविंदपूर त. जि. गडचिरोली तर उर्वरित जखमींचे नाव लता विजय सातपुते वय 40 वर्ष रा. गोविंदपूर त. जी. गडचिरोली,सुधाकर रमेश दुधबळे वय 24 वर्ष रा. नवेगाव रे. त. चामोर्शी जी. गडचिरोली तर गंभीर जखमी झालेल्या व्यक्तीचे नाव प्रकृती देवेंद्र नामदेव भांडेकर वय 42 वर्ष रा. नवेगाव रे. त. चामोर्शी जी. गडचिरोली असून त्याची प्रकृती स्थिर पण,पायाला गंभीर मार लागून त्याची हाडे मोडली आहे.

आरोपी कारचालका ला अटक करण्यात आली असून त्याच्या निष्काळजीने वाहन चालवण्यासाठी गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

गडचिरोली जिल्ह्यात सर्व महामार्गांवर होणाऱ्या वाहतुकीला नियंत्रण करण्याची जबाबदारी महामार्ग पोलिसांवर असताना सुद्धा दररोज कुठे ना कुठे अपघाताच्या घटना रोज घडत असल्याने वाहतूक विभागाच्या कार्यप्रणालीवर लोकांकडून शंका उपस्थित केली जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here