गडचिरोली,ता.९: छत्तीसगड राज्यातील पत्रकार मुकेश चंद्राकर यांच्या निर्घृण हत्येच्या निषेधार्थ आज गडचिरोली येथे पत्रकारांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मूक मोर्चा काढला.
पत्रकारांनी जिल्हाधिकारी अविशांत पांडा आणि पोलिस अधीक्षक नीलोत्पल यांना निवेदन दिले. पत्रकार मुकेश चंद्राकर यांच्या मारेकऱ्यांना कठोर शिक्षा द्यावी, तसेच जिल्ह्यातील पत्रकारांना निर्भीडपणे पत्रकारिता करता यावी, यासाठी पत्रकार संरक्षण समिती कार्यान्वित करावी इत्यादी मागण्या पत्रकारांनी केल्या.
या मूक मोर्चात ज्येष्ठ पत्रकार मुनिश्वर बोरकर,कैलाश शर्मा व्यंकटेश दुडमवार, संजय तिपाले, गडचिरोली प्रेस क्लबचे अध्यक्ष सुरेश पद्मशाली,पत्रकार मुकुंद जोशी, उदय धकाते, हेमंत डोर्लीकर, प्रल्हाद म्हशाखेत्री, प्रकाश ताकसांडे, प्रकाश दुबे, जगदीश कन्नाके, मारोती भैसारे, विलास ढोरे, सूरज हजारे, राजरतन मेश्राम, प्रा.दिलीप कहुरके, नासिर जुम्मन शेख, हेमंत दुनेदार, महेश सचदेव, दिनेश बनकर,कृष्णा वाघाडे,हस्ते भगत,नाझिर शेख,भाविकदास कळमकर,मुकेश हजारे,संदीप कांबळे,विनोद कुळवे,किशोर खेवले,सोमनाथ उईके, नीलेश सातपुते,संतोष सुरपाम,शंकर ढोलगे,जयंत निमगडे, हर्ष साखरे,कबिर निकुरे,प्रमोद राऊत, विजय शेडमाके,टॉवर मडावी,उमेश गझपल्लीवार,पुंडलिक भांडेकर,अनुप मेश्राम,श्रावण वाकोडे, कालिदास बुरांडे,धनराज वासेकर,विलास वाळके, गोर्वधन गोटेफोटे,रवी मंडावार,राजेश खोब्रागडे, चोखोबा ढवळे,सतीश ढेभुर्णे,गेडाम,धम्मपाल दुधे,नाजुक भैसारे,रेखा वंजारी,विजया इंगळे,तिलोत्तमा हाजरा यांच्यासह जिल्हाभरातील शेकडो पत्रकार सहभागी झाले होते.