व्हॉईस ऑफ मिडीया संघटनेची देसाईगंज तालुका कार्यकारिणी घोषित…

0
161

अध्यक्षपदी विलास ढोरे तर सचिवपदी प्रा. दयाराम फटिंग यांची निवड

देसाईगंज, १२ जुलै :- ‘व्हॉईस ऑफ मिडीया’चे गडचिरोली जिल्हाध्यक्ष व्यंकटेश दूडमवार, जिल्हा सरचिटणीस कैलास शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली व जेष्ठ पत्रकार शामराव बारई यांच्या अध्यक्षतेखाली ०९ जुलै रोजी घेण्यात आलेल्या बैठकीत देसाईगंज तालुका कार्यकारिणी घोषित करण्यात आली.

या तालुका कार्यकारिणीमध्ये मार्गदर्शक शामराव बारई, अध्यक्ष विलास ढोरे, कार्याध्यक्ष महेश सचदेव, संघटक/कार्यवाह राजरतन मेश्राम, उपाध्यक्ष प्रा. दिलीप कहुरके, रवींद्र कुथे, सरचिटणीस प्रा. दयाराम फटिंग, सहसरचिटणीस शैलेश पोटवार, कोषाध्यक्ष राहुल मेश्राम, कार्यवाहक पंकज चहांदे, सदस्य घनश्याम कोकोडे, इलियास पठाण, विष्णू दूनेदार, अतुल बुराडे, प्रियंका ठाकरे, प्रकाश जिवाणी आदींची पदाधिकारी म्हणून निवड करण्यात आली.

देशभरात पञकारांसाठी अनेक संघटना कार्यरत आहेत. त्यापैकी व्हॉईस ऑफ मिडीया संघटनेने पञकारांच्या कल्याणासाठी पञकारांचा जिवन विमा, निवासी  घरे, सेवानिवृत्ती योजना, पाल्यांच्या शिक्षणासाठी शैक्षणिक मदत, नवे तंत्रज्ञान शिकवणी या सारखे पंचसूत्री कार्यक्रम राबविण्यासाठी आश्वासक पाऊल उचलले आहे.

व्हॉईस ऑफ मिडीया या पञकार संघटनेची देशभरातील व्याप्ती आणि संघटनेनी मांडलेल्या पंचसूत्री कार्यक्रम हे पञकारांसाठी कल्याणकारी असुन पञकारांनी व्हॉईस ऑफ मिडीया संघटनेच्या पाठीशी राहावे, असे आवाहन या कार्यकरीणीच्या वतीने करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here