गडचिरोली.10मार्च.
गडचिरोली शहरात चामोर्षी रोडवरील शिवसेना कार्यालयात आज तिथी प्रमाणे शिव जयंती चे आयोजन करण्यात आले.
या कार्यक्रमाला सर्वप्रथम छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आल्यानंतर लगेच मसाला भात आणि जिलेबी चा महाप्रसाद वितरण करण्यात आला होता.
या कार्यक्रमात महाविकास आघाडीचे नेते सुध्दा सहभागी झालेले असून,सदर कार्यक्रमात आयटक संघटनेच्या महिला कार्यकर्त्यांनी दिलेला निवेदन सुध्दा शिवसेना नेत्या छायाताई कुंभारे यांनी स्वीकारला होता हे विशेष…
या कार्यक्रमाला शिवसेनेचे विधानसभा संघटक नंदुभाऊ कूमरे,छायाताई कुंभारे,रांका कार्याध्यक्ष प्रकाश ताकसांडे,रांका जिल्हा उपाध्यक्ष फहिमभाई काझी,संजय कोचे,डॉ.किरकिरे,पंडितराव पुडके तथा जेष्ठ पत्रकार नरेंद्र महेश्वरी,व्हॉईस ऑफ मीडिया चे सचिव कैलाश शर्मा यांच्या सह शिवसेनेचे शेकडो शिवसैनिक आणि महिला कार्यकर्त्या उपस्थित होत्या.