निर्धास्त जीवन जगायच असेल तर , शक्ती- युक्ती- आणि भक्ती चा अंगिकार करायला हवा……महेशबाबा घुगे.

0
167

प्रबोधन….

दिनांक.१८/२/२०२३

शक्ती, युक्ती आणि भक्ती हे ” त्री सुत्र ” यशस्वी समाधानी, आणि प्रसन्न जीवनाच रहस्य आहे. शक्ति- युक्ती – आणि भक्ती चं प्रतिक म्हणून पवनपुत्र हनुमानाकडे बघितले जात. 

स्वतः हनुमान शक्तीशाली होता .त्यामुळे प्रसंगी मेरु – पर्वत ऊचलून आणण्याची धमक हनुमानात होती. शक्तिमान हनुमानाची प्रभु रामचंद्रांवर नितांत श्रद्धा, अर्थात भक्ती होती .शिवाय हनुमंताला युक्तीही अवगत होती. नुसती ताकद असून ऊपयोगाच नसत, .त्या तागदीचा सदुपयोग करता यावा म्हणून कुणावर तरी श्रद्धा असावी लागते.

श्रद्धावान, बलवान माणसात युक्ती ही आवश्यक असते. हनुमंताजवळ युक्ती नसती तर, शक्तिशाली रावणाची लंका त्याला जाळता आली नसती. हनुमानातील, शक्ती, युक्ती आणि भक्ति आपण अवगत केली तर आपल्यालाही आपल जीवन बिनधास्त जगता येऊ शकते.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here