लक्ष्मी दूध व्यवसायिक संस्थेवर बंग गटाचा एक हाती झेंडा…

0
116

 

हिंगणा.(नागपूर) 1/2/2023

 

हिंगणा तालुक्यातील महत्त्वाच्या संस्थांपैकी एक असलेली मोहगाव येथील लक्ष्मी दुग्ध व्यवसाय संस्थेच्या झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत माजी मंत्री रमेशचंद्र बंग यांच्या गटाचा मोठ्या भरघोस मतांनी विजयी झाला.

 

तेरा सदस्य असलेल्या संस्थेवर पाच सदस्य अविरोध निवडून आले तर आठ सदस्य पदांकरिता झालेल्या निवडणुकीत माजी मंत्री रमेशचंद्र बंग समर्थित पॅनलचा दणदणीत विजय झाला निवडून आलेल्या सदस्यांमध्ये निखिल कृष्णराव उमरेडकर, प्रमोद निघोट, व्‍यंकटी मळावी, हरिभाऊ भरडे, बजरंग रंदई, दिलीप कोवे, सतीश मणियार, देवराव बेलेकर, रमेश बागडे, अंकुश कोल्हे, चरण गोहणे, कामिनाबाई नारनवरे, संगीताबाई ढोक, यांचा समावेश आहे. निवडून आलेले सर्व सदस्य माजी मंत्री रमेशचंद्र बंग यांच्या निवासस्थानी येऊन आशीर्वाद घेतले. तर बंग यांनी सर्वांना पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा दिल्या.

यावेळी जिल्हा परिषदेतील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे गटनेते दिनेश बंग,माजी पंचायत समिती सभापती भैय्याजी चौधरी, माजी जि प सदस्य मारोती हजारें लोमेश फलके, सुरेश उमरेडकर, छोटू बागडे, सुधाकर भोंडे, खुशाल भोंडे गोकुल मणियार, योगेश येरगुडे, मनोज गोहणे, तुकाराम मडावी, शेषराव मानकर, अतुल बागडे, अनिल ढोक प्रामुख्याने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here