Gadchiroli district highlights.31/12/2022
गडचिरोली महिला काँग्रेस जिल्हाध्यक्ष रूपालीताई पंदीलवार यांचा एक वर्षाचा कार्यकाळ पूर्ण झाला त्या निमित्ताने स्नेहमिलन व एक वर्षाची पूर्तता कार्यक्रम घेण्यात आला.या प्रसंगी रुपालीताई यांचा शाल श्रीफळ,पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
गडचिरोली महिला काँग्रेस जिल्हाध्यक्ष म्हणून एका वर्षाच्या कालावधीत प्रत्येक घराघरात कांग्रेस ची विचारधारा पोहचविण्याचे कार्य रुपालीताई यांनी अल्पावधीतच करून दाखविले आहे.
प्रत्येक तालुक्यात लोकांच्या समस्या कमी वेळात सोडवण्यासाठीचा कानमंत्र या या कार्यक्रमात रुपालीताई त्यांनी पदाधिकाऱ्यांना समजाऊन सांगितला.
या वर्षपुर्तीच्या कार्यक्रमात वरिष्ठांचे आभार मानून,जिल्ह्यातील प्रत्येक महिला कार्यकर्त्यांच्या भावना समजाऊन घेत येणाऱ्या काळात संपूर्ण जिल्हा कांग्रेसमय करण्याचा प्रयत्नही केला जाणार असल्याची प्रतिक्रिया रुपाली ताई यांनी व्यक्त केली आहे.
या प्रसंगी गडचिरोली तालुका अध्यक्ष कल्पना नंदेश्वर, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या महासचिव चंदा कोडवते, वडसा तालुकाध्यक्ष आरती लहरी, कुरखेडा तालुका अध्यक्ष आशा तुलावी, आरमोरी तालुका अध्यक्ष मंगल कोले, आशा मेश्राम, तालुका उपाध्यक्ष भडके पोर्णिमा ताई, जिल्हा उपाध्यक्ष निशा अतुलवार महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस पक्षाचे महासचिव नामदेव उसेंडी, आरती कंगाले, सुमन उंदीरवाडे, माल्तापुरा गीता बोरकर, कुंदा तितरमारे, संध्या नेताम, प्रतिभा सीडाम, विमल मेश्राम, प्राची कोडापे, वर्षा गुल देवकर यांच्या सह असंख्य महिला सहभागी झाल्या होत्या.