Home सामाजिक जागतिक महिला दिनानिमित्त सेमाना देवस्थान येथे स्वच्छता अभियान; ‘ग्रीन वारियर’ व युवा...

जागतिक महिला दिनानिमित्त सेमाना देवस्थान येथे स्वच्छता अभियान; ‘ग्रीन वारियर’ व युवा क्लबचा पुढाकार…

0
119

 

गडचिरोली :

जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून गडचिरोली–चामोर्शी मार्गावरील भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या सेमाना देवस्थान परिसरात भव्य स्वच्छता अभियान राबविण्यात आले. ‘ग्रीन वारियर’ आणि युवा क्लबच्या संयुक्त पुढाकारातून पार पडलेल्या या उपक्रमात मोठ्या उत्साहात सहभाग नोंदवून परिसरातील कचरा हटवून देवस्थान परिसर स्वच्छ व चकाचक करण्यात आला.

सेमाना देवस्थान हे गडचिरोली जिल्ह्यातील एक महत्त्वाचे धार्मिक व पर्यटनस्थळ मानले जाते. येथे दररोज शेकडो भाविक दर्शनासाठी येत असतात. वाढत्या भाविक व पर्यटकांच्या संख्येमुळे परिसरात कचरा साचण्याचे प्रमाण वाढत असल्याने पर्यावरण स्वच्छ ठेवण्याच्या उद्देशाने युवकांनी हा स्वच्छता उपक्रम हाती घेतला. या मोहिमेत सहभागी झालेल्या युवकांनी देवस्थान परिसरातील प्लास्टिक, कचरा आणि इतर घाण साफ करून परिसराला स्वच्छतेचे नवे रूप दिले.

या स्तुत्य उपक्रमाचे सामाजिक व राजकीय क्षेत्रातील मान्यवरांनीही कौतुक केले. स्वच्छता अभियानादरम्यान नगर परिषद पाणीपुरवठा सभापती लिलाधर भरडकर, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक हेमंत बोरकुटे, डॉ. दीप बोदले, शिवणीचे सरपंच किरण ताटपल्लीवार, प्रा. राजेश कात्रटवार, प्रा. दिनेश देशमुख, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष मयूर धकाते तसेच सामाजिक कार्यकर्ते कृष्णाजी शेंडे यांनी प्रत्यक्ष उपस्थित राहून स्वच्छतामित्रांचा उत्साह वाढवला आणि त्यांच्या कार्याचे कौतुक केले.

या स्वच्छता अभियानात स्वच्छतामित्र हर्षवर्धन मडावी, सुधीर मुनघाटे, मोहित समर्थ, मनोज उईके, मंथन लोळे, महेश धारणे, कुणाल गावतुरे, आदित्य कुद्रपावर, वैभव गेडाम, गौरव सेलोटे, आशिष दुर्गे, प्रणय सोनुले, वृषभ कुळमेथे, रामकृष्ण कडते यांनी सक्रिय सहभाग नोंदवला.

तसेच महिला दिनाचे औचित्य साधून संध्या मडावी, सपना हिचामी आणि ममता लेनगुरे यांनीही या स्वच्छता मोहिमेत सहभागी होत महिलांचीही पर्यावरण संवर्धनात महत्त्वाची भूमिका असल्याचा संदेश दिला.

नगर परिषद पाणीपुरवठा सभापती लिलाधर भरडकर म्हणाले, “केवळ शासन किंवा प्रशासनावर विसंबून न राहता तरुणांनी स्वतःहून स्वच्छतेसाठी पुढे येणे ही काळाची गरज आहे. ग्रीन वारियर आणि युवा क्लबने महिला दिनाचे औचित्य साधून दिलेला हा संदेश अत्यंत कौतुकास्पद आहे.”

कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक हेमंत बोरकुटे यांनी सांगितले, “धार्मिक स्थळे ही आपल्या संस्कृतीचे प्रतीक आहेत. ती स्वच्छ ठेवणे हे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे. या युवकांच्या कार्यामुळे सेमाना परिसराला नवसंजीवनी मिळाली आहे.”

डॉ. दीप बोदले म्हणाले, “आजच्या काळात पर्यावरणाचे संरक्षण करणे अत्यंत आवश्यक आहे. ‘स्वच्छ गडचिरोली, सुंदर गडचिरोली’ हे स्वप्न अशा सामाजिक उपक्रमांमधूनच प्रत्यक्षात उतरेल.”

या उपक्रमातून “स्वच्छ गडचिरोली, सुंदर गडचिरोली” असा संदेश देण्यात आला असून भाविक व पर्यटकांनीही देवस्थान परिसर स्वच्छ ठेवण्यास सहकार्य करावे, असे आवाहन ‘ग्रीन वारियर’तर्फे करण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here