Gadchiroli.date 4/10/2022 गडचिरोली जिल्ह्यातील राजनगरी या नावाने ओळखल्या जाणाऱ्या अहेरी तालुक्यातील येलचील या गावात एका 50 वर्षीय आदिवासी महिलेवर ट्रक चालकाने बलात्कार केल्याची घटना गुरुवारी उघडकीस आली.
पिडीत महिलेची तक्रार दाखल केल्यानंतर लगेच पोलिसांनी आपली यंत्रणा गोपनीय मार्गाने सक्रिय करीत आरोपीला तीन दिवसात छत्तीसगढ राज्यात कांकेर येथून शोधून काढण्यात अहेरी पोलिसांनी यशस्वी कामगिरी बजावली होती.
पिडीत महिलेवर अत्याचार करणाऱ्या आरोपींचे नाव संतलाल कोठारी वय 31 वर्ष असून हा छत्तीसगढ राज्यात रायपूर येथे रंधावा या नावाच्या ट्रक मालकाकडे चालक होता अशी माहिती पोलिस सूत्रांनी दिली आहे.
या घटनेमुळे ग्रामीण भागातील आदिवासी लोकांमध्ये मोठा आक्रोश निर्माण झालेला दिसून आलेले होते.
प्रकरणाची गंभीरता लक्षात घेऊन उप विभागीय पोलिस अधिकारी अमोल ठाकूर यांच्या मार्गदर्शनात पोलिस निरीक्षक किशोर मनभाव यांच्या नेतृत्वाखाली पोलिसांनी आपली गोपनीय सूत्र चालवीत आरोपीस ताबडतोब अटक केल्याने या परिसरातील नागरिकांनी अहेरी पोलिसांचे कौतुक केले आहे.
अत्याचार करणारा आरोपी हा सुरजागढ खनिज वाहतूक करणाऱ्या ट्रक वर चालक असल्याची शंका या परिसरातील नागरिकांनी व्यक्त केली आहे, या घटनेची माहिती पोलिसांनी गोपनीय ठेवली होती हे विशेष…
आरोपीला अहेरी न्यायालयात हजर करण्यात आल्यानंतर माननीय न्यायलयाने आरोपीला 6 ऑक्टोंबर पर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.पुढील तपास अहेरी पोलिस करीत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.