Home राजकीय शाहीनताई हकीम यांची राष्ट्रवादी महिला काँग्रेस (शरदचंद्र पवार गट) राष्ट्रीय कार्यकारिणीवर नियुक्ती…

शाहीनताई हकीम यांची राष्ट्रवादी महिला काँग्रेस (शरदचंद्र पवार गट) राष्ट्रीय कार्यकारिणीवर नियुक्ती…

0
135

मोठी बातमी | गडचिरोली

शाहीनताई हकीम यांची राष्ट्रवादी महिला काँग्रेस (शरदचंद्र पवार गट) राष्ट्रीय कार्यकारिणीवर नियुक्त

अहेरी (जि. गडचिरोली) येथील सामाजिक, राजकीय व महिला सक्षमीकरणाच्या क्षेत्रात सातत्याने कार्यरत असलेल्या श्रीमती शाहीनताई हकीम यांची राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडी (शरदचंद्र पवार गट) च्या राष्ट्रीय कार्यकारिणी समितीच्या सदस्या म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. ही महत्त्वपूर्ण नियुक्ती राष्ट्रीय अध्यक्षा सौ. फौजिया खान यांच्या हस्ते जाहीर करण्यात आली.

महिला सक्षमीकरण, सामाजिक उपक्रम, वंचित घटकांचे प्रश्न तसेच संघटनात्मक बांधणीमध्ये शाहीनताई हकीम यांनी केलेल्या उल्लेखनीय कार्याची दखल घेत ही नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या अनुभवामुळे आणि कार्यशैलीमुळे पक्षाच्या राष्ट्रीय पातळीवरील महिला संघटनाला नवी दिशा मिळेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

या नियुक्तीमुळे गडचिरोली जिल्ह्यासह आदिवासी व दुर्गम भागातील महिलांच्या प्रश्नांना राष्ट्रीय स्तरावर प्रभावी व्यासपीठ मिळणार असून, राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या संघटनात्मक मजबुतीस मोठे बळ मिळणार आहे.

या निवडीबद्दल जिल्ह्यातील राजकीय, सामाजिक क्षेत्रातील मान्यवर, महिला आघाडीतील पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी शाहीनताई हकीम यांचे अभिनंदन करत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. शाहीनताई यांच्या नेतृत्वातून महिलांच्या हक्कांना आणि प्रश्नांना अधिक ठोस न्याय मिळेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here