सुरजागड खनिज घेऊन जाणारा ट्रक शिरला घरात…

0
1380
गोंडपिपरीत घडला विचित्र अपघात,अपघातात चालकाचा जागीच मृत्यू

Chandrpur.date 16/9/2022

गोंडपिपरी: चंद्रपूर दिशेकडून आलापल्ली मार्गे निघालेला हायवा ट्रक ( क्रमांक : एम एच 34 -बी झेड -1092 ) कन्यका नागरी सहकारी बँकेसमोर आले असता चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले. त्यामुळे ट्रकने दुभाजक तोडून बंडू बळीराम बांगरे यांच्या घरात घुसली सुदैवाने बांगरे कुटुंबीयांची जीवित हाणि टळली परंतु ट्रक वाहन चालकाचा जागीच मृत्यू झाला. आज दुपारी एक वाजता च्या दरम्यान ही घटना घडली या घटनेनत बांगरे यांच्या घरा समोर असणाऱ्या दुचाकीवाहनांचा सुद्धा चेंदामेंदा झाला.घटनेच्या वेळेस उपस्थित नागरिकांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत पोलीस प्रशासनाला माहिती दिली. माहिती मिळताच पोलीस कर्मचारी तात्काळ घटनास्थळी उपस्थित झाले.

दुपारी झालेल्या अपघातामुळे बराच वेळ वाहतुकीस कोंडी निर्माण झाली होती. झालेल्या भीषण अपघातात बंडू बळीराम बांगरे यांच्या मालमत्तेचे चांगलीच नुकसान झाल्या चे दिसते.पोलीस प्रशासनाच्या अथक प्रयत्नानंतर वाहनात अडकलेल्या मृत चालकाला आणि हायवा ट्रक ला क्रेनच्या सहाय्याने बाहेर काढण्यात पोलीस प्रशासनाला यश आले.

संबंधित हायवा ट्रक पंकज जैन च्या मालकीचे असून सुरजागड लोह प्रकल्प या ठिकानाहुन लोह खनिजाची वाहतूक करण्यासाठी कार्यरत असल्याची माहिती आहे. सदर अपघातग्रस्त हायवा ट्रक चा मृत चालक बिहार राज्याचा असल्याचे बोलले जात आहे. प्रवासाच्या दिशेने जात असताना दुभाजक तोडून विरुद्ध दिशेने आणि मार्ग सोडून वाहन एका व्यक्तीच्या घरात घुसत असेल तर ही घटना किती अंगाला शहारे आणण्यासारखी असेल याची प्रचिती उपस्थित नागरिकांना झाली होती हे विशेष…

झालेल्या भीषण अपघाताची समोरील कार्यवाही ठाणेदार जीवन राजगुरू यांच्या मार्गदर्शनात केला जात आहे .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here