सहा महिण्यात सैनिक कॉलनीच्या रस्त्याचा प्रश्न मार्गी लावा…. महेशबाबा घुगे

0
108

Date.16/9/2022
धुळे:- सैनिक काँलनी आणि परिसरातील नागरिकांची वहातुकीची गैर सोय लक्षात घेता सैनिक काँलनी ते जुना आग्रा रोड पंर्यतच्या रस्त्यांचा प्रश्न मार्गी लावण्याची विनंती, धुळे जिल्हा माजी सैनिक सघटनेचे अध्यक्ष,जेष्ठ पत्रकार महेशबाबा घुगे यांनी महापौर प्रदीपनाना कर्पे आणि महानगर पालीका आयुक्त देवीदास टेकाळे यांना केली.

दि. 20 व 21 सप्टेंबर 2022 दरम्यान आहमदाबाद येथे
राष्ट्रीय सतरावर संपन्न होणार्या महापौर परिषदेत सहभागी होण्याचे मान महाराष्ट्रातून केवळ  प्रदीपनाना कर्पे यांनाच मिळाला असल्याने , त्यांना शुभेच्छा देण्यासाठी व त्यांचे आभिनंदन करण्यासाठी, महेशबाबा घुगे यांनी त्यांची सदिच्छा भेट घेतली , तेव्हा , महेशबाबांनी , कर्पेनानांना आणि देविदास टेकाळे यांना , सैनिक कॉलनी च्या रस्त्याचा प्रलंबीत प्रश्न मार्गी लावण्याची विनंती केली.

महापौर कर्पै आणि आयुक्त टेकाळे यांनी सकारात्माख भूमिका घेऊन सैनिक कॉलनी च प्रश्न तातडींने मार्गी लावण्याचे अभिवचन दिले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here