पदवीधर विधानपरिषद मतदार नोंदणी पुनरिक्षण कार्यक्रम २०२५ जाहीर! पात्र पदवीधरांनी मतदार नोंदणी करावी – जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा सर्वांना नव्याने अर्ज सादर करणे बंधनकारक…

0
57

 

 

गडचिरोली, दि. ३० : भारत निवडणूक आयोगाने नागपूर विभाग पदवीधर विधानपरिषद मतदारसंघासाठी मतदार यादी पुनरिक्षण कार्यक्रम जाहीर केला आहे. या अंतर्गत १ नोव्हेंबर २०२५ हा अर्हता दिनांक निश्चित करण्यात आला आहे. गडचिरोली जिल्ह्यातील सर्व पात्र पदवीधरांनी आपले नाव मतदार यादीत समाविष्ट करण्यासाठी नमुना १८ (Form 18) भरून अर्ज करावा, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा सहायक मतदार नोंदणी अधिकारी अविश्यांत पंडा यांनी केले आहे.

कार्यक्रमाच्या महत्त्वाच्या तारखा…

कार्यक्रमाची सुरुवात : ३० सप्टेंबर २०२५ (मंगळवार) – जाहीर सूचना…

अर्ज सादरीकरणाचा अंतिम दिनांक : ०६ नोव्हेंबर २०२५ (गुरुवार)

हस्तलिखिते तयार करून प्रारूप मतदार यादी छपाई : २० नोव्हेंबर २०२५ पर्यंत.

प्रारूप मतदार यादी प्रकाशन : २५ नोव्हेंबर २०२५ (मंगळवार)

दावे व हरकती स्वीकारण्याचा कालावधी : २५ नोव्हेंबर ते १० डिसेंबर २०२५

दावे व हरकतींवरील निर्णय व पुरवणी यादी : २५ डिसेंबर २०२५ (गुरुवार)

अंतिम मतदार यादी प्रकाशन : ३० डिसेंबर २०२५ (मंगळवार)

पात्रता निकष…

शैक्षणिक पात्रता : भारतातील कोणत्याही विद्यापीठाची पदवी किंवा समतुल्य परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक.

कालमर्यादा : पदवी परीक्षा ०१/११/२०२५ पूर्वी किमान तीन वर्षांपूर्वी उत्तीर्ण केलेली असावी. (निकाल जाहीर झाल्याची तारीख ग्राह्य)

निवास अट : अर्जदार नागपूर पदवीधर मतदारसंघात वास्तव्यास असावा आणि भारताचा नागरिक असावा.

नवीन अर्ज अनिवार्य : सन २०२० च्या यादीत नाव असले तरी २०२६ च्या निवडणुकीसाठी नव्याने अर्ज करणे बंधनकारक आहे.

अर्ज प्रक्रिया…

अर्ज नमुना १८ मध्ये करावा.

अर्ज सादर करण्याचे ठिकाण : जिल्ह्यातील सर्व उपविभागीय व तहसील कार्यालये.

अर्ज टपालाद्वारेही सादर करता येईल (आवश्यक कागदपत्रांसह).

गठ्ठा पद्धतीने अर्ज स्वीकृत केले जाणार नाहीत. मात्र विभाग प्रमुख आपल्या अधिनस्त अधिकारी/कर्मचाऱ्यांचे अर्ज एकत्रित सादर करू शकतात.

कुटुंबातील व्यक्ती देखील आपल्या कुटुंबातील पात्र पदवीधरासाठी अर्ज करू शकतो, परंतु दोघांचा रहिवास पत्ता सारखाच असावा.

आवश्यक कागदपत्रे…

अर्जासोबत खालीलपैकी कोणतेही एक पुरावे जोडणे आवश्यक आहे :

विद्यापीठाने निर्गमित पदवी प्रमाणपत्र.

शासकीय दप्तरी नोंद.

विद्यापीठाने निर्गमित नोंदणी कार्ड.

अंतिम वर्षाची मूळ गुणपत्रिका.

नागपूर विभागीय आयुक्त हे मतदार नोंदणी अधिकारी असून, गडचिरोली जिल्ह्यासाठी जिल्हाधिकारी व उपविभागीय अधिकारी सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी म्हणून काम पाहतील.

 

गडचिरोली जिल्ह्यातील सर्व पात्र पदवीधरांनी आवश्यक पुराव्यांसह ०६ नोव्हेंबर २०२५ पर्यंत अर्ज दाखल करून मतदार यादीत नाव नोंदवावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here