गडचिरोली:स्वातंत्र्य दिनाचे औचीत्य साधून midc मधील श्री साई सीमेंट ब्रिक्स चे मालक मलिक बुधवानी यांचे कडून त्यांच्या विटा बनविणाऱ्या कारखान्यात काम करणाऱ्या कामगारांचे व इष्ट मित्रांचे आपघाती विमा काढण्यात आला आहे..
आजच्या युगात कोणताही अपघात केंव्हा होईल हे सांगता येत नाही, कामगारा विषयी आपूलकीची भावना ठेवत त्यांचे कुटुंबाविषयी काळजी घेण्याची जबाबदारी स्वतः घेऊन बुधवाणी यांनी आपल्या 75 कामगार व मित्रांचा प्रत्येकी 5 लाखाचा अपघाती विमा काढूण त्यांचा कुटुंबाची संकटकाळात होणारी मोठी आर्थिक अडचण दूर केली आहे.
गडचिरोली जिल्हात चारही महामार्गांवर होणारी वाहतूक मोठ्या प्रमाणात वाढल्याने अपघाताचे प्रमाण सुद्धा वाढलेले आहे. त्यामुळे अपघाती इसमाच्या कुटुंबाला आर्थीक आधार व्हाव्हे या उद्देशाने प्रत्येक कुटुंब प्रमुखांचे अपघाती विमा काढणे आवश्यक झाले आहे. या पूर्वीही बुधवानी यांनी आपले कर्मचारी स्व. राकेश कोहपरे यांचे परिवाराला सुद्धा १८ लाखाची आर्थिक मदत विमा कंपनी कडून मिळवून दिली होती आहे .
“या विषयी श्री साई सिमोन्टर विटा उद्योगाचे मालक मलिक बुधवानी यांचे सर्व स्तरावरुण कौतूक करण्यात येत आहे.