नदीच्या पुलावरून उडी घेतलेल्या व्यक्तीचे पोलिसांनी जीव वाचवले…

0
1262

गडचिरोली:गडचिरोली नागपूर रोडवरील कठाणी नदीच्या पुलावरून एक युवकाने उडी मारल्याची घटना आज सायंकाळी 7 वाजताच्या सुमारास घडली.

या घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि SDRF यंत्रणा ताबडतोब घटनास्थळी पोहोचली होती त्यावेळेस जवळपास अंधार पसरलेला होता.टॉर्च घेऊन पोलिसांनी अंधारात शोध घेतला असता मोठ्या पुलाच्या जवळ कमी पाण्याच्या भागात सदर व्यक्ती जखमी अवस्थेत पडलेला दिसला.सदर जखमी अवस्थेत सापडलेल्या व्यक्तीचे नाव प्रीतम टेंभुर्णे राहणार गडचिरोली असून त्याने नदीच्या पुलावरून उडी का घेतली याची माहिती सध्या मिळाली नाही.

पोलिसांनी ताबडतोब रुग्णवाहिका बोलावून सदर इसमाला सामान्य रुग्णालयात दाखल केले असून सध्या त्याची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात आले आहे.

या घटनेची माहिती मिळताच पोलिस निरीक्षक विनोद चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक प्रमोदकुमार बघेले,सहायक पोलीस निरीक्षक विजय मुसनवार यांच्या नेतृत्वात पोलिस यंत्रणा वेळेवर दाखल झाल्याने आज या युवकाचे जीव वाचले असल्याची चर्चा शहरात सुरू झाली होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here