गडचिरोली भाजप जिल्हाध्यक्ष पदासाठी रस्सीखेच; मोठ्या उद्योजकाचे नाव आघाडीवर……

0
515

 

 

गडचिरोली |

 

गडचिरोली जिल्ह्यात भारतीय जनता पार्टीच्या जिल्हाध्यक्ष पदासाठी सध्या चांगलीच रस्सीखेच सुरू आहे. 2024 च्या लोकसभा व विधानसभा निवडणुकांमध्ये झालेल्या गडचिरोलीची स्थानिक एक विधानसभा वगळता आरमोरी विधानसभेत झालेला पराभव व लोकसभेत झालेला पराभव अशा अपेक्षाभंगानंतर पक्षाकडून नव्या नेतृत्वाच्या शोधाला गती मिळेल काय हे पाहणे गरजेचे झाले आहे. भाजपच्या प्रदेश नेतृत्वाने स्पष्ट सूचना दिल्या आहेत की जिल्हाध्यक्ष पदासाठी नवे, बळकट आणि संघटन कौशल्य असलेले व्यक्तिमत्त्व निवडणे अत्यावश्यक आहे.

 

एकीकडे माजी आमदार डॉ.देवराव होळी यांनी रेती बॉम्ब टाकल्यामुळे त्यांच्या मनात सुद्धा जिल्हाध्यक्षांची माळ आपल्या गळ्यात पडली पाहिजे असे त्यांना वाटत असेल,रेती बॉम्ब टाकून आपण सध्याचे  जिल्हाध्यक्ष वाघरे यांना पायउतार करण्यात यशस्वी होऊ असा केविलवाणा प्रयत्न होळी यांच्या वतीने केला जात असेल यात मुळीच शंका नाही.पण प्रशांत वाघरे यांची संघटन चालविण्याची प्रेमळ पद्धतच त्यांना एक वेळा पुन्हा जिल्हाध्यक्ष होण्याची  संधी देईल अशी सुद्धा चर्चा सुरू झालेली आहे.

जिल्ह्यातील कार्यकर्त्यांमध्ये विद्यमान नेतृत्वा विषयी थोडेफार प्रमाणात नाराजी असल्याचा कांगावा करून,संघातील एका मोठ्या पदाधिकाऱ्याने आपल्या जवळच्या मोठ्या उद्योजकाचे नाव पुढे केले जात असल्याचेही बोलले जात आहे. त्यामुळे आगामी काळात पक्ष बळकट करण्यासाठी आणि विरोधकांना प्रभावी उत्तर देण्यासाठी, जुनेच जिल्हाध्यक्ष प्रशांत वाघरे यांनाच अत्यंत प्रभावशाली आणि संघटन कौशल्य गतीमान करण्यासाठी पुन्हा एकदा संधी दिली पाहिजे, अशी कार्यकर्त्यांचीही मागणी आहे.

 

आज जिल्हाध्यक्ष पदाच्या निवड प्रक्रियेच्या पारदर्शकतेसाठी व निवडणूक प्रक्रियेसाठी निरीक्षक म्हणून भाजपचे वरीष्ठ नेते गिरीष व्यास आणि हेमंत पटले यांचे गडचिरोली दौऱ्यावर आज आगमन होत आहे. या निवड प्रक्रियेकडे संपूर्ण जिल्ह्यातील कार्यकर्त्यांचे लक्ष लागले आहे.

 

जिल्हाध्यक्ष पदासाठी कमीत कमी पाच ते सहा इच्छुक उमेदवार रिंगणात असल्याची माहिती मिळत आहे. पक्षातील  महिला उमेदवार यांना सुद्धा संधी मिळण्याची शक्यता आहे त्या अनुषंगाने सर्व उमेदवार आपापली लॉबिंग व शक्तीप्रदर्शन गुप्त पद्धतीने सुरू ठेवत असून, पक्षश्रेष्ठींना आपली बाजू भक्कमपणे मांडण्याचा प्रयत्न करत आहेत. राज्यात आणि केंद्रात सत्ता असल्यामुळे, गडचिरोलीसारख्या संवेदनशील जिल्ह्याला प्रभावी नेतृत्व मिळणे काळाची गरज मानली जात आहे.

 

भाजपच्या नव्या जिल्हाध्यक्षाकडून संघटना बळकट करणे, स्थानिक पातळीवर कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण करणे आणि आगामी स्थानिक व सार्वत्रिक निवडणुकांमध्ये पक्षाचा विजय सुनिश्चित करणे, अशा मोठ्या अपेक्षा आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here