लॉयन्स क्लब तर्फे स्वच्छता अभियान…

0
48

 

गडचिरोली:स्वच्छता करण्याची जबाबदारी ही फक्त शासन कींवा सफाई कामगार यांचीच आहे हा विचार आपण सोडला पाहिजे. आपणच अस्वच्छतेला मात करून स्वच्छतेच्या दिशेकडे वळले पाहिजे. घराची व परिसराची स्वच्छता हे आरोग्याचे महत्त्वाचे अंग आहे.याबद्दल समाजामध्ये जाणीव जागृती करणे महत्त्वाचे आहे.

“परिसर स्वच्छ ठेवाल , तर निरोगी व्हाल”

ह्याचं मोहिमेच्या आधारावर दिनांक 6 ऑक्टोबर 2024, रविवारला मानवता सेवा सप्ताह अंतर्गत सेमाना मंदिर परिसर येथे लायन्स क्लब तर्फे स्वच्छता अभियान राबविण्यात आले. ह्यावेळी क्लबचे संस्थापक नारायण पद्मावार,सचिव नितीन चेंबूलवार ,उपाध्यक्ष महेश बोरेवार, उपाध्यक्ष किशोर चीलमवार , भुजंग हिरे,नितीन बट्टूवार,शालिनीताई कुमरे ,प्रणाली वरखेडे,सविता बट्टूवार, पुरुषोत्तम वंजारी आदि लॉयन सदस्य उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here