
गडचिरोली: गडचिरोली शहरापासून फक्त चार किमी अंतरावर असलेल्या चामोर्शी रोड वरील वाकडी फाट्यावर एका मालवाहक ट्रक ने स्कूटी चालक वृध्द दाम्पत्याला धडक दिल्याने वृध्द महिला जागीच ठार तर वृध्द पुरुष थोडक्यात बचावला. ही घटना आज दुपारी ४.१५ मिनिटाला घडली.
मृतक महिलेचा नाव कुंदा जनार्दन आखाडे वय ६२ वर्ष निवासी कुनघाडा असून सूरजागड वरून खनिज वाहतूक करणाऱ्या ट्रक च्या एकदम जवळ येताच बॅलन्स बिघडल्याने स्कूटी स्वार दाम्पत्य भांबावून पडले, त्यामुळे वृध्द महिला ट्रक च्या खाली चिरडल्या गेल्याची माहिती घटनास्थळी उभे असलेल्या लोकांनी दिली.
अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा करून मृतक महिलेचा शव शव विच्छेदनासाठी पाठविण्यात आले होते.
या घटने मुळे गडचिरोली शहराच्या बाहेरून भारवाहक वाहणांकरिता बायपास रस्ता निर्माण करण्याची मागणी नागरिकांमधून होत आहे.