गडचिरोली.
गडचिरोली विधान सभा निवडणुकीसाठी गडचिरोली विधानसभा मतदार संघात काँगेस कडून इच्छुकांची संख्या वाढली आहे. आतापर्यंत विश्वजीत कोवासे, कुसुम आलाम, गजानन दुग्गा, रवींद्र सुरपाम, सदानंद ताराम, डॉ. सोनल कोवे , यांनी पक्षाकडे उमेदवारीसाठी अर्ज दाखल केला. इच्छुकांची संख्या वाढत असली तरी डॉ. नामदेव उसेंडी नंतर विश्वजित कोवासे यांची गडचिरोली विधानसभा क्षेत्रावर दावेदारी मजबूत होती. डॉ. उसेंडी यांच्या भाजप प्रवेशानंतर काँग्रेस पक्षातून विश्वजित कोवासे यांचे नाव उमेदवारीसाठी आघाडीवर आहे. त्यांनी मतदार संघात गेल्या पाच वर्षापासुन सात्यत्याने जनसंपर्क ठेवला असून एक युवा चेहरा म्हणून त्यांच्या नावावर मतदार संघात अनुकुलता आहे. त्यामुळें ते काँग्रेस कडून प्रभावी उमेदवार ठरू शकतात. त्यांचे पिता माजी खासदार मारोतराव कोवासे यांनी गडचिरोली विधानसभा मतदार संघाचे दोनदा प्रतिनिधित्व केले. त्यामुळे या मतदार संघात त्यांचा जनसंपर्क दांडगा आहे, याचा फायदा विश्वजित कोवासे यांना मिळण्याची जास्त शक्यता आहे. ही जागा युवक काँग्रेसच्या कोट्यात द्यावी अशी मागणी विश्वजित कोवासे यांनी वरिष्ठांकडे केली आहे. त्यामुळे या मतदार संघात विश्वजित कोवासे हे प्रबळ दावेदार व प्रभावी उमेदवार ठरू शकतात