Gadchiroli district highlights…
गडचिरोली.(लगाम)
गडचिरोली जिल्ह्यातील दक्षिण भागात महामार्गाची होत असलेली चाळन बघता,एस टी महामंडळ च्या मानव विकास मिशन अंतर्गत चालणाऱ्या बसेस अनेक ठिकाणी बंद करण्यात आल्या मुळे शेकडो विद्यार्थ्यांना शिक्षण घेणे मोठे अडचणीचे झाले होते,तसेच अनेक गावात नागरिकांनी नवीन बसेस चालू करण्यासाठी एक महिन्यापूर्वी चक्काजाम आंदोलन सुध्दा केले होते.
विद्यार्थ्यांची शिक्षणाची सोय अडचणीत येत असलेली परिस्थिती पाहून लॉयड मेटल कंपनी च्या वतीने सामाजिक दायित्व निभावत आज लगाम परिसरात विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यासाठी नवीन स्कूल बस चे शुभारंभ करण्यात आले,नवीन स्कूल बस चालू झाल्याने या परिसरातील जवळपास पन्नास किलोमीटर अंतरावर राहणारे विद्यार्थ्यांची अडचण दूर होऊन त्यांना शिक्षणाचा अधिकार घेणे सोपे जाईल अशी ग्वाही लॉयड मेटल कंपनी कडून देण्यात आली आहे.
लगाम बोरी,रामपूर, चुटूगुंटा,असे अनेक गावातील विद्यार्थ्यांची अडचण आता संपुष्टात आणण्यासाठी नेहमी प्रयत्नशील असलेले भाजप चे महामंत्री रवी ओलालवार यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला आहे,या उद्घाटन प्रसंगी राजापूर पॅच चे सरपंच मधुकर वेलादी,उपसरपंच लिंगाची दुर्गे,ग्राप सदस्य सुरेश गंगाधरीवार,लगाम चे सरपंच मडावी,माजी सरपंच मनीष मारटकर,माजी जीप सदस्य ऋषी पोरतेड,प्रसाद सावकार,यांच्यासह शेकडो विद्यार्थी,पालकवर्ग तथा गणमान्य नागरिक उपस्थित होते.