कोनसरी प्रकल्पग्रस्त लोकांच्या जनसुनावणीत नागरिकांनी विचारलेल्या प्रश्नांना लॉयड मेटल कंपनी कडून समर्पक उत्तर …
गडचिरोली.लॉयड मेटल कंपनी चे एम डी प्रभाकरन यांनी कोनसरी प्रकल्पाच्या माध्यमातून सात गावातील नागरिकांना बोलाऊन पारदर्शी पद्धतीने सुनावणी घेतल्यामुळे,शासन आपल्या दारी अभियानाची सुरुवात करण्यासाठी आलेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे,उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,अजित पवार यांच्या सोबत अन्य चार मंत्र्यांच्या उपस्थितीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते जाहीर सत्कार करण्यात आला होता.
या सुनावणीत हजारो लोकांच्या समस्या जाणून घेण्याचा प्रयत्न लॉयड मेटल कंपनी च्या वतीने करण्यात येणार असल्याचेही कंपनी च्या वतीने जाहीर करण्यात आले होते.प्रकल्पग्रस्त झालेल्या प्रत्येक गावात पिण्याचे पाणी, प्राथमिक आरोग्य केंद्र,भूमिहीन शेतकऱ्यांच्या शिक्षित वारसानाला नौकरी देऊन, प्रत्येक कुटुंबाला प्राधान्य देत सर्वांच्या अडी अडचणी सोडविण्यााठी कटिबध्द असल्याची माहिती प्रभाकरन यांनी जाहीर सत्कार सोहळ्यात बोलताना दिली.