नवीन लोकसभेचा उद्घाटन राष्ट्रपती द्रौपदी मूर्मू यांच्या हस्ते न केल्याने काँग्रेस पक्षाच्या वतीने भाजप चा निषेध..
गडचिरोली २७मे. नवीन लोकसभेचा उद्घाटन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांच्या हस्ते न करता प्रधानमंत्री नरेंद्र मोदींच्या वतीने होणार असल्याचे विरोधात आज गड़चिरोली शहरातील इंदिरा गांधी चौक येथे काँग्रेस पक्षाच्या वतीने भाजप सरकार चा निषेध करण्यात आला.
दिल्ली येथील नव्याने बांधण्यात आलेल्या नवीन लोकसभेचा उद्घाटन राष्ट्रपती द्रौपदी मूर्मु यांच्या हस्ते न करता प्रधानमंत्री नरेंद्र मोदींच्या वतीने करण्याचा प्रयत्न केंद्राची भाजप सरकार करीत आहे.जेष्ठ आदिवासी नेता महामहीम राष्ट्रपती द्रौपदी मूर्मु यांना डावलण्याचा प्रयत्न करणे हा देशातील सर्वोच्च पदाचा आणि सर्व आदिवासींचा अपमान आहे असे प्रतिपादन माजी आमदार डॉ नामदेव उसेंडी आणि महिला काँग्रेस अध्यक्षा एड.कविता मोहरकर यांनी केले आहे.
यावेळी गडचिरोली जिल्हा काँग्रेस अध्यक्ष महेंद्र ब्राम्हणवाडे, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस महासचिव तथा जि. प्रभारी डॉ. नामदेव किरसान, माजी आमदार डॉ. नामदेव उसेंडी, प्रदेश सचिव डॉ. नितीन कोडवते,शहर अध्यक्ष सतीश विधाते, महिला अध्यक्ष ऍड. कविता मोहरकर, प्रदेश प्रतिनिधी प्रा. समशेरखान पठाण, ग्राहक सेल अध्यक्ष भारत येरमे, अनुसूचित जाती सेल अध्यक्ष रजनीकांत मोटघरे, परिवहन सेल अध्यक्ष रुपेश टिकले, तालुकाध्यक्ष वसंत राऊत, प्रभाकर वासेकर, नेताजी गावतुरे, पांडुरंग घोटेकर, काशिनाथ भडके, फिरोज हुद्दा, नृपेश नांदनकर, रुपेश धकाते, महेश जिलेवार, योगेश्वर झंजाळ, मिलिंद बारसागडे, चोखाजी भांडेकर, अनिल कोठारे, अपर्णा खेवले, सुषमा भडके, कल्पना नंदेश्वर, आशा मेश्राम, पौर्णिमा भडके, वंदना ढोक, वर्षा गुलदेवकर, अविनाश श्रीरामवार यांचे सह शेकडो काँग्रेस कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.