मतदारांचा आश्रमशाळेत मेळा जमविल्या प्रकरणी गुन्हे दाखल करा महाविकास आघाडी आणि शेकापची तक्रार …

0
358

 

Gadchiroli district highlights..28/4/2023

पोलिस प्रशासन घेतोय बघ्याची भूमिका..

गडचिरोली : चांदाळा येथील आश्रम शाळेत शेकडो मतदारांना बंदिस्त करून ठेवल्याप्रकरणी तातडीने छापा घालून पंचनामा करावा आणि मतदारांना मुक्त करुन दोषींवर गुन्हे दाखल करावेत अशी तक्रार गडचिरोली पोलीस ठाण्यात करण्यात आली.

 

 

महाविकास आघाडी चे उमेदवार वसंत राऊत आणि शेतकरी कामगार पक्षाचे उमेदवार योगाजी चापले यांनी याप्रकरणी रात्री १.०० वाजता गडचिरोली पोलीस स्टेशन ला लेखी तक्रार देवून म्हटले की, नियम आणि कायदे धाब्यावर बसवून, आचारसंहितेचा भंग करुन निवडणूक प्रभावीत करण्याचे काम केले आहे. दारू, मटन आणि पैशांचे लालूच दाखवून मतदारांना वि.दा.सावरकर आश्रम शाळेत बंदिस्त करणारे उमेदवार बलवंत लाकडे आणि उमेदवार विजयालक्ष्मी जंबेवार यांचे पती हेमंत जंबेवार यांचेवर गुन्हे दाखल करा अशी मागणी करण्यात आली आहे.

 

या प्रकारामुळे गडचिरोली बाजार समितीच्या निवडणुकीत मोठा तणाव निर्माण झाला असून गडचिरोली पोलीस स्टेशन ला महाविकास आघाडी आणि शेतकरी कामगार पक्षाच्या शेकडो कार्यकर्त्यांनी धडक देवून पोलीसांनी कारवाई करा अन्यथा आंदोलन करु असा इशारा दिला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here