डॉ. नानासाहेब धर्माधिकार्यानी महाराष्ट्र भुषण पुरस्कार परत करायला हवा..महेशबाबा घुगे.

0
120

धुळे.18/4/2023
श्रद्धेय डॉ. बाळासाहेब ऊर्फ दत्तात्रय धर्माधिकारी यांचे लाखो अनुयायी आणि या अनुयायांच्या माध्यमातून ते करत असलेल्या जनसेवेला तोड नाही,, पण महाराष्ट्र शासनाने देऊ केलेल्या , “महाराष्ट्र भुषण ” पुरस्कार सोहळ्यात सहभाग घेतलेल्या 13 जणाचा ऊष्माघाताने झालेला म्रुत्यु आणि  ऊष्माघातामुळे रुग्ण शय्येवर शेकडो रुग्ण घेत असलेला ऊपचाराच्या पार्श्वभूमीवर ऊठलेले टीकेचे वावटळ लक्षात घेता , नानासाहेब धर्माधिकारी यांनी , महाराष्ट्र भूषण ” हा पुरस्कार परत करणे ऊचित ठरेल…

खरतर नानासाहेब धर्माधिकारी यांनी ,आपल्या अनुयायांद्वारे आतापंर्यत केलेले कार्य ईतके महान आहे की,त्यापुढे, महाराष्ट्र भुषण हा पुरस्कार खूप छोटा आहे.महाराष्ट्र शासनाने (अर्थात एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणीस यांनी ) राजकिय ईप्सीत साध्य करण्यासाठी यंदाचा हा पुरस्कार जाहिर केला व त्याला डॉ. बाळासाहेब धर्माधिकारी बळी पडलेत हे सूर्य प्रकाशाईतके स्पष्ठ आहे. अन्यथा हा पुरस्कार नेहमी प्रमाणे मुंबई पुण्यातील एका मोठ्या सभाग्रुहात सन्मानपूर्क आणि सर्व पक्षीय नेत्यांच्या ऊपस्थितीत प्रदान करता आला असता. वीस लाख अनुयायांना गैरसोय सहन करित , येवढ्या जीवघेण्या ऊष्णतेत ऊपस्थितीत रहाण्याची भावनात्मक सक्ती करण्याचीही गरज नव्हती.

वीस लाख अनुयायांच्या ऊपस्थितीत हा पुरस्कार देण्याच्या निर्णयालाच मुळात नानासाहेब धर्माधिकाऱ्यांनी विरोध करायला हवा होता. पण शिंन्दे फडणवीस यांच्या भुलभुलय्याला नानासाहेब धर्माधिकारी बळी पडलेत ,आणि आपल्या तेरा प्राणप्रिय अनुयायांचे प्राण गमावून बसलेत व शेकडोंना रुग्णशय्येवर झोपण्यास भाग पाडले.

घर फिरलेकी वासेही फिरतात तशी गत नानासाहेब धर्माधिकारी यांची सध्या झाली आहे. आज पंर्यत त्यांच्या कार्यावर शिंतोडे ऊडविण्याची संधी कुणाला मिळाली नव्हती पण , या दुर्घटनेमुळे चारही दिशांनी टीकेची ऊठलेली वावटळ, आता नानासाहेब धर्माधिकारी यांना टारगेट करु लागली आहे.कोट्यवधी रुपये संचीत असलेल्या त्यांच्या विश्वस्त मंडळातील चारही पदाधिकारी हे त्यांच्या कुटुंबातीलच सदस्य आहेत व तेच वारस हक्काने हयात रहातील अशी कायदेशीर तरतुद डॉ. धर्माधिकारी यांनी करुन ठेवल्याची बाब माहितीच्या अधिकारात ऊजेडात आल्याने डॉ. धर्माधिकारी यांच्या भोवती संशयाचे काळे ढग जमू लागले आहे .

या सर्व पार्श्वभूमीचा व आता पंर्यंत डॉ. नानासाहेब दत्तात्रय धर्माधिकारी यांनी केलेल्या कार्याचा विचार करता, , टीकेचे माध्यम ठरत असलेला ” “महाराष्ट्र भुषण ” हा पुरस्कार त्यांनी सन्मान पूर्वक परत करुन झालेली चुक दुरुस्त करायला हवी.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here