बिघडलेली वाहतूक दुरुस्त करण्यासाठी सद्बुद्धी येणार काय प्रशासनाला….
Gadchiroli district highlights.८डिसेंबर
गडचिरोली शहरातील केदार वाड्यासमोर एक महिला शिक्षिका ट्रक खाली चिरडल्याने मृत्यू झाल्याची घटना काल दुपारी चार वाजता घडली.
या अपघातात मृत्यू झालेल्या महिलेचे नाव प्रिया धाईत(साळवे)वय३५ वर्ष असून ती डॉ.बाबासाहेब आंबेडकर प्राथमिक शाळा कॉम्प्लेक्स या ठिकाणी कार्यरत होती.अपघात घडताच पोलिस यंत्रणा घटनास्थळी पोहचलेली होती,गंभीर जख्मी झालेल्या शिक्षक महिलेला सामान्य रुग्णालयात पाठविण्यात आले होते परंतु प्राथमिक उपचार सुरू असतानाच प्रकृती गंभीर झाल्याने,नागपूर ला नेत असताना वाटेतच तिचा मृत्यू झाला होता.
गडचिरोली शहरात मागील तीन वर्षांपासून महामार्गाचे काम कासवगतीने होत असल्याने, तसेच रस्त्याच्या बाजूला दुकानदारांनी केलेल्या अतिक्रमणे तथा गडचिरोली पोलिसांच्या वाहतूक विभगाच्या दुर्लक्षित पणामुळे दोन वर्षातला अपघाताचा पाचवा बळी पडला आहे.
सतत रखडलेली कामे करणारी महामार्ग यंत्रणा, आणि झोपी गेलेला पोलिस वाहतूक विभाग आतातरी जागा होईल अशी अपेक्षा लोकांकडून करण्यात येत आहे.