रेती तस्करांच्या मदतीने पुलखल गावच्या ग्रामसभेत दारुड्यांचा धिंगाणा…सुज्ञ नागरिकांना सभेतून परत जाण्याची आली वेळ.

0
694

Gadchiroli district highlights…
गडचिरोली.15डिसेंबर.
गडचिरोली शहरापासून अवघ्या दहा किमी अंतरावर असलेल्या पुलखल गावाच्या ग्रामसभेत रेती तस्करांच्या मदतीने दारुड्यांनी  धिंगाणा घातल्याचा लाजिरवाणा प्रकार आज दुपारी झालेल्या ग्रामसभेत घडला.
आज नेहमी प्रमाणे पुलखल ग्राम पंचायत मध्ये सहामाही हिशोबाकरिता ग्राम सभेचे आयोजन करण्यात आले होते.या ग्राम सभेत काही लोकांनी रेती तस्करांच्या मदतीने दारू पिऊन धिंगाणा घातला होता,त्या ठिकाणी गडचिरोली पोलिसांचे दोन कर्मचारी उपस्थित असतांनाही असा लाजिरवाणा प्रकार घडला असल्याने आता गडचिरोली पोलिसांच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्याची गरज निर्माण झालेली आहे.
गडचिरोली जिल्ह्यात दारूबंदी असतांनाही दारू मुबलक प्रमाणात उपलब्ध होते, अशी धक्कादायक बाब समोर आली आहे अशा ठिकाणी पोलिस अधिक्षकांनी कठोर कारवाई केली पाहिजे अशी मागणी पुलखल गावातील लोकांनी केली आहे.
ग्राम सभेत दारुड्यांचा धिंगाणा होत असून सुरक्षे साठी कर्तव्यावर असलेले दोघे कर्मचारी मुकाट्याने बसून झालेल्या प्रकाराकडे दुर्लक्ष करीत असल्याची माहिती पोलिस निरीक्षक अरविंद कतलाम यांना दिली असता, आम्ही तुमच्या म्हणल्याने कारवाई करणार काय,आम्ही आमच्या हिशोबाने काम करू अशी चक्क मुजोरीच केली होती हे विशेष…

झालेल्या घटनेची माहिती पोलिस अधीक्षक निलोत्पल बासू यांना मोबाईल वर लगेच देण्यात आली असून, पुलखल गावात दारू उपलब्ध करीत  असलेल्या लोकांवर त्यांच्या वतीने कठोर कारवाई केंव्हा होते याकडे लोकांचे लक्ष लागले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here